धक्कादायक! केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ३६ जवानांच्या वर्षभरात आत्महत्या
N4U
११:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (National Crime Record Bureau/NCRB) नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (Central Armed Police Force) ३६ जवानांनी () केली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये अशा प्रकारच्या एकूण ४३३ घटना घडल्या आहेत. च्या माहितीनुसार, सहा वर्षांच्या काळात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ४३३ जवानांनी आत्महत्या केली. सन २०१८ मध्ये सर्वात कमी, म्हणजेच २८ घटनांची नोंद झाली आहे, तर सन २०१४ मध्ये सर्वाधिक १७५ घटना घडल्या आहेत. (36 central armed forces personnel committed suicides in 2019) सन २०१७ मध्ये अशा घटनांची संख्या ६० इतकी होती, कर सन २०१६ मध्ये ७४ आणि सन २०१५ मध्ये ६० जवानांनी आत्महत्या केली. गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेल्या सीएपीएफमध्ये एकूण सात केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश आहे. यात आसाम रायफल्सव्यतिरिक्त, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, सशस्त्र सीमा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डचा समावेश आहे. १ जानेवारी २०१९ ला सीएपीएफमध्ये (CAPF) एकूण ९ लाख २३ हजार ८०० कर्मचारी होते, असे एनसीआरबीने () सांगितले. हे दल सीमांच्या सुरक्षेव्यतिरिक्त आंतरिक सुरक्षा राखण्यासाठी, तसेच बेकायदेशीर कारवायांवर अंकुश लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या मदतीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. सन २०१९ मध्ये सुमारे ४३,००० शेतकरी आणि मजुरांनी केली आत्महत्या: एनसीआरबी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये सुमोारे ४३,००० शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्षाच्या काळात देशभरात एकूण १ लाख ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली. आकडेवारीनुसार, वर्षाच्या काळात एकूण ३२ हजार ५६३ रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी आपले जीवन संपवले. एकूण आत्महत्यांमध्ये ही संख्या सुमारे २३.४ टक्के इतकी होती. क्लिक करा आणि वाचा- तर एका वर्षापूर्वी सन २०१८ मध्ये ही संख्या ३० हजार १३२ इतकी होती. एनसीआरबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मधअये कृषिक्षेत्राशी संबंधित एकूण १० हजार २८१ लोकांनी (यात ५,९५७ शेतकरी आणि ४,३२४ मजूर आहेत) आत्महत्या केली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
September 03, 2020 at 10:19AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा