केरळमध्ये CPMच्या २ कार्यकर्त्यांची हत्या; काँग्रेसवर आरोप
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
तिरुवनंतपुरम: केरळच्या तिरुवनंतपुरमध्ये सीपीएमच्या दोन कार्यकर्त्यांची करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यामागे काँग्रेस असल्याचा आरोप सीपीएमने केला आहे. पोलिसांनी संशयावरून तिघा आरोपींना अटक केली आहे. वेंजरामुड्डू परिसरात ही घटना घडली. रविवारी रात्री उशिरा वेमबायमचे रहिवासी मिथिलज (वय ३२) आणि हक मोहम्मद (वय २५) दुचाकीवरून जात होते. हक हा मिथिलज याला त्याच्या घरी सोडण्यासाठी जात होता. थेम्मपाम्मुड्डू परिसरात ते आले असता, वाटेतच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने तरुणांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, ते पाहता किमान पाच जण हल्लेखोर असू शकतात. दोघांच्या शरीरावर खोलवर जखमा होत्या. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप या घटनेनंतर सीपीएमने काँग्रेसवर आरोप केले आहेत. पक्ष कार्यकर्त्यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात असल्याचे सीपीएमने म्हटले आहे. राजकीय सूडातून कार्यकर्त्यांची हत्या घडवून आणली आहे. पक्षाकडून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा या हत्येमागे हात असल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे. घटनास्थळावरून दोन दुचाकी जप्त, प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील लोकांची चौकशी केली जात आहे. काही प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात असून, त्यांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. घटनास्थळावर दोन दुचाकी आढळून आल्या आहेत. त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. डीवायएफआयचे नेते ए.ए. रहीम यांनी ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे.
https://ift.tt/3fcy07h
August 31, 2020 at 11:16AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा