पॅन्गाँग सरोवराजवळ भारत - चीन सैनिक पुन्हा एकमेकांना भिडले
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला. पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री एकमेकांना भिडल्याचं समोर येतंय. चीनी सैनिकांकडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनी सेनेच्या ''च्या () जवानांनी शेवटच्या बैठकीत झालेला करारही तोडला आणि पूर्व लडाख भागात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय जवानांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चीनी सेनेची घुसखोरी रोखली, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलीय. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : दरम्यान, भारताकडून या भागात सैनिकांची संख्या वाढवण्यात आलीय. चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावार फ्लॅग मीटिंग सुरू आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यानचा तणाव काही निवळताना दिसत नाही. सैन्य स्तरावर चर्चा सुरू असतानाच परराष्ट्र मंत्रालय आणि दोन्ही देशांच्या 'वर्किंग मॅकेनिजम फॉर कन्सल्टेशन अँड को-ऑर्डिनेशन'नंही चर्चा केलीय. परंतु, वादावर तोडगा निघालेला नाही. इतर बातम्या :वाचा : वाचा : १९९९ मध्येही भारताचं लक्ष्य पाकिस्तानच्या कारगिलमधील घुसखोरीवर असताना चीननं आपल्या बेसपासून फिंगर ४ पर्यंत एक कच्चा मार्ग बनवला होता. त्यानंतर तो पक्का करण्यात आला.
https://ift.tt/3fcy07h
August 31, 2020 at 11:30AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा