N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेली, पण...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पीलीभीत: उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील एका ३६ वर्षीय महिलेने पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडला सोबत घेऊन ऑस्ट्रेलियाला गेली, मात्र लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. तेथून परत आल्यानंतर दोघांच्या प्रेमसंबंधांचा भंडाफोड झाला. दोघेही ६ जानेवारीला ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यांना मार्चमध्ये परत यायचं होतं. पण लॉकडाउनमुळे ते २४ ऑगस्टला परतले. ते दोघे परत आल्यानंतर महिलेच्या पतीने (वय ४६) पोलिसांत तक्रार दिली. पत्नी आणि संदीप सिंह (वय ३६) या दोघांचे अनैतिक संबंध आहेत. दोघांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्याच्या नावाने पासपोर्ट तयार केला. या दाम्पत्याची मुले ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत. पतीने केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक जय प्रकाश यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. पतीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे. तक्रारदार गेल्या २० वर्षांपासून मुंबईत काम करतो. कधी कधी तो पत्नीला भेटण्यासाठी घरी जातो. त्याची पत्नी पीलीभीतमध्ये फार्महाऊस आणि शेतीचे काम पाहते. मी १८ मे रोजी घरी परतलो असता, पत्नी घरी नसल्याचे समजले. संदीपच्या कुटुंबीयांकडून समजले की, दोघेही ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. संदीपने माझ्या नावाने पासपोर्ट तयार करून विदेश दौऱ्यावर गेला नाही ना, हे जाणून घेण्यासाठी मी बरेलीत पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यावेळी २ फेब्रुवारी २०१९ रोजी माझ्या नावाने पासपोर्ट तयार केला आहे, अशी माहिती त्या कार्यालयातून मला मिळाली, असे महिलेच्या पतीने सांगितले. या प्रकाराची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे. बनावट पासपोर्ट तयार कसा केला याची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

https://ift.tt/3fcy07h
August 31, 2020 at 11:56AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा