N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

...तर २०२४ ही अंतिम निवडणूक ठरेल : दिग्विजय सिंह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते () यांनी पुन्हा एकदा 'ईव्हीएम'च्या मुद्द्याला हात घातलाय. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. भारतीय राजकारणाविषयी चिंता जाहीर करतानाच, ' भारतीय लोकशाहीला उद्ध्वस्त करत असल्याचं' दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि फेरफार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 'आपण निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केला नाही तर २०२४ (Loksabha Election 2024) ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल' असंही दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : दिग्विजय सिंह यांनी शेअर केलेल्या व्हिडिओचं हेडिंग आहे 'फेसबुकनं उद्ध्वस्त केलेली लोकशाही'... (Carole Cadwalladr) या व्हिडिओमध्ये फेसबुकच्या माध्यमातून ''च्या माध्यमातून निवडणुकांवर कशा पद्धतीनं प्रभाव पाडला, हे सांगताना दिसत आहेत. आपल्या भाषणाचा एक छोटा भाग कॅडवॉलर यांनी आपल्या ट्विटर अकाऊन्टवरून शेअर केलाय. ' ही एक घातक वैश्विक शक्ती आहे जी उदारमतवादी लोकशाहीला नष्ट करतेय. हेच मी जेव्ही TED मध्ये म्हटलं होतं. तेव्हा हे वास्तवात सिलिकॉन व्हॅलीला हादरवणारं होतं. १६ महिन्यांमध्ये आता हे प्रत्येकालाच स्पष्टपणे दिसतंय. पण आपण मात्र हेडलाईटसमध्ये गोठलोय' असं कॅडवॉलर यांनी या व्हिडिओसोबत म्हटलंय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत सहा दशलक्षहूनअधिक लोकांनी पाहिलाय. या व्हिडिओमध्ये त्या निवडणुकीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या हेराफेरीवर भाष्य करताना दिसत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम द्वारे निवडणूक घेण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतलाय. दुसरीकडे, काँग्रेसपक्षांतर्गत सुरू असलेल्या वादात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधणं सुरूच ठेवलंय. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारवर निशाणा साधलाय. 'कमलनाथ सरकारनं गौशाळेसाठी १३२ कोटींचं प्रावधान ठेवलं होतं. आता हे भाजप सरकारनं ११ कोटींवर आणलंय. आता तुम्हीच सांगा की गौमातेचा खरा भक्त कोण आहे, कमलनाथ की शिवराज सिंह चौहान?' असं म्हणत त्यांनी भाजप सरकारच्या दाव्यांची पोलखोल केलीय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
August 31, 2020 at 11:09AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा