N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

West Bengal: सामूहिक बलात्कारानंतर विद्यार्थिनीची हत्या; TMC नेत्यावर आरोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
दिनाजपूर: पश्चिम बंगालमधील दिनाजपूरमध्ये विद्यार्थिनीवरील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून राजकारण पेटले आहे. प्रदेश भाजपने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर आरोप केले आहेत. तर भाजपला यावरून राजकारण करायचे आहे, असे प्रत्युत्तर टीएमसीने दिले आहे. टीएमसीचे नेते पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे, बलात्काराची घटना घडलीच नाही, असे पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी, रविवारी या घटनेच्या विरोधात दिनाजपूरच्या कलागछ परिसरात लोक रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी रस्ता रोखल्यानंतर पोलिसांची वाहने आणि बस पेटवून दिल्या. या घटनेनंतर प्रदेश भाजपने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर आरोप केले आहेत. पीडिता स्थानिक नेत्याची बहीण होती आणि तृणमूलच्या नेत्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपकडून चिथावणी दिली जात असल्याचा आरोप भाजपने केलेले आरोप सत्ताधारी तृणमूलकडून फेटाळले आहेत. एका विशेष वर्गातील लोकांना चिथावणी दिली जात असून, शांतता भंग करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे तृणमूलचे म्हणणे आहे. 'ही खूपच दुर्दैवी घटना आहे. आम्ही या घटनेवरून राजकारण करत नाही. या घटनेचा तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर करण्यात येईल. आम्ही पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहोत,' असे मंत्री गौतम देव यांनी सांगितले. कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नाही पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू विषामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिच्या शरीरावर कुठेही जखमा आढळून आल्या नाहीत. लैंगिक आणि शारीरिक अत्याचार झाल्याचेही अहवालात स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात अद्याप पीडितेच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. हिंसक वळण विद्यार्थिनीवर बलात्कार आणि हत्येनंतर संतापलेल्या लोकांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केले. वाहने पेटवून दिली. त्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

https://ift.tt/3fcy07h
July 20, 2020 at 12:02PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा