धक्कादायक! पुण्यात नराधम बापानंच केला ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
N4U
१:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

पुणे: बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातील परिसरात उघडकीस आली आहे. नराधम बापानंच आपल्या पोटच्या ११ वर्षीय केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे. रिपोर्टनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात एका ३४ वर्षीय व्यक्तीनं आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी तिच्या आईनं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुण्यातील न्यायालयात पोलिसांनी आरोपीला हजर केले. त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं दोन आठवड्यांपूर्वी पीडित मुलीवर त्याच्या घरातच बलात्कार केला. त्यानंतर गुरुवारी रात्री घराच्या जवळच असलेल्या निर्जनस्थळी नेलं आणि तिथं तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेच्या आईनं दिघी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेची आई ही गृहिणी असून, आरोपी हा कारचालक आहे. या प्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूरमध्येही अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली होती. नराधम बापानं दारूच्या नशेत आपल्या पोटच्या सात वर्षीय मुलीवर टेम्पोत नेऊन बलात्कार केला होता. काही तासांतच आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. गोवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरफला काया गावात ही धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत नराधम बापानं सात वर्षीय मुलीवर बलात्कार केला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. ३६ वर्षीय आरोपी हा टेम्पो चालक आहे. नई गावात तो राहतो. पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. तिचा पती हा दारू पिऊन मारहाण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या सततच्या मारहाणीला कंटाळून ती काही दिवसांपूर्वी आपल्या आई-वडिलांच्या घरी सरफला येथे निघून गेली होती. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी तिला भेटण्यासाठी घरी आला होता. तेथे येऊन त्याने भांडण केले. त्याने मुलीला घेतले आणि निघून गेला. त्यानंतर मध्यरात्री त्याने मुलीला भावाच्या दुकानावर सोडले, असेही तिने तक्रारीत नमूद केले होते.
https://ift.tt/3fau8np
July 20, 2020 at 12:51PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा