N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'पंतप्रधान मोदी हे 'नकली स्ट्राँगमॅन'; सत्तेत येण्यासाठी बनवली प्रतिमा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष (Rahul Gandhi) हे भारत-तीन तणावावरून आक्रमक होत सतत केंद्र सरकार आणि (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंवर व्हिडिओची एक मालिकाच सुरू केली आहे. या द्वारे ते विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत घेरत आहेत. आज पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेबाबत तिखट भाष्य केले आहे. ( Criticizes Over India-China clash) एक मजबूत नेत्याच्या रुपात आपली प्रतिमा कायम राखणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मजबुरी आहे आणि चीनने याचाच फायदा उचलत पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेवर प्रहार करत आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. चीनची ही चाल ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला उत्तर देणार की, आपल्या प्रतिमेत्या चिंतेत चीनपुढे नांगी टाकणार हे आता पाहायचे, असेही राहुल गांधी म्हणाले. हा प्रश्न उपस्थित करताना राहुल गांधी यांनी या प्रश्नाचे उत्तर देखील देऊन टाकले. मला वाटते की पंतप्रधान मोदी दबावात आलेले आहेत, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे. पंतप्रधान मोदी काय करणार? चीनच्या या पवित्र्यावर पंतप्रधान मोदी काय करणार, काय ते चीनचा सामना करतील, क्या ते आव्हान स्वीकारून मी भारताचा पंतप्रधान असून मला माझ्या प्रतिमेची चिंता नाही, मी तुमचा सामना करेन असे म्हणणार, की चीनपुढे नांगी टाकणार, असे एकावर एक प्रश्न विचारच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. वाचा: पंतप्रधान मोदी हे दबावात आले आहेत आणि हीच माझी चिंता आहे. चीन आमच्या भूमीत येऊन बसला आहे आणि पंतप्रधान जाहीरपणे सांगतायत की चीन आपल्या भूमीत आलेला नाही. याचाच अर्थ ते आपली प्रतिमा जपण्याच्या मागे लागलेले आहेत आणि त्याद्वारे ते स्वत:चा बचाव करत आहेत हे स्पष्ट होत आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले. वाचा: आपल्या प्रतिमेमुळे आपण पंतप्रधान मोदींवर हावी होऊ शकतो हे समजण्याची संधी जर ते चीनला देत असतील, तर असे पंतप्रधान देशाच्या कामाचे राहणार नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
July 20, 2020 at 11:52AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा