coronavirus updates: आईचा करोनाने मृत्यू; तिला खंदा देणाऱ्या ५ मुलांचाही झाला मृ्त्यू
N4U
१०:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

रांची: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोनाने (Coronavirus Updates) झारखंडमधील एका हसत्या-खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकले आहे. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर या कुटुंबातील तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला. प्रथम आईचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांनंतर तिला खांदा देणाऱ्या तिच्या ५ मुलांचाही मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसातच या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या महिलेल्या आणखी एका मुलासह कुुटुंबातील इतर सदस्यांचीही प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण देशभरात करोनामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू होण्याचे अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण आहे. ( after their mother due to ) करोनामुळे कुटुंबातील ६ व्या सदस्याचा मृत्यू हे प्रकरण धनबादमधील कतरास येथील आहे. रानी बाजारात राहणाऱ्या एका कुटुंबातील सहा सदस्यांच्या सोमवारी करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलैच्या दिवशी सर्वप्रथम ८८ वर्षीय आईचे बोकारोमधील एका नर्सिंग होमममध्ये निधन झाले. मृतदेहाचे पोस्टमार्टेम झाल्यानंतर या महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या महिलेच्या एका मुलाचा मृत्यू रांचीमधील रिम्स कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनीच दुसऱ्या मुलाचा देखील केंद्रीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाचा: १५ दिवसांतच उद्ध्वस्त झाला हसता-खेळता परिवार मृत्यूचे हे तांडव येथेच थांबले नाही. या महिलेचा तिसरा मुलगाही धनबादमधील एका खासगी रुग्णालयात क्वारंटीन सेंटरमध्ये दाखल झाला होता. तेथे अचानक त्याची तब्येत बिघडली आणि तेथे त्याचा मृत्यू झाला. त्यांचे ड्रायव्हर त्यांना पीएमसीएचला घेऊन गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले. १६ जुलैला चौथ्या मुलाचे देखील टीएमएच जमशेदपूरमध्ये कॅन्सरच्या आजारावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पाचवा मुलगा देखील धनबाद येथील कोविड रुग्णालयाने रिम्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवल्यानंतर तेथे त्याचे निधन झाले. या कुटुंबातील इतर अनेक सदस्यांवर देखील उपचार सुरू आहेत. या कुटुंबाची कहाणी ऐकून प्रत्येकजण हादरून जात आहे. अशा प्रकारचे उदाहरण संपूर्ण भारतात घडले नसल्याचे म्हणत परिसरात राहणारा प्रत्येकजण दु:खाने व्यथित होत आहे. वाचा: वाचा:
https://ift.tt/3fcy07h
July 21, 2020 at 09:43AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा