N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

हिरानंदानी रुग्णालयास जाब विचारणाऱ्या शिवसैनिकाला धमकी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: करोनामुळं मृत्यू झालेल्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जात नसल्याबद्दल हिरानंदानी रुग्णालयाच्या प्रशासनाला जाब विचारणारे शिवसेनेचे पदाधिकारी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नांदगावकर यांनी याबाबत नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नितीन नांदगावकर हे एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. अडीअडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचा व व्यवस्थेला जाब विचारण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळं ते लोकप्रिय आहेत. अलीकडंच हिरानंदानी रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं ते चर्चेत आले आहेत. वाचा: पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात एका करोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. त्या रिक्षाचालकाच्या उपचाराचं बिल आठ लाख रुपये झालं होतं. ते भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाणार नसल्याची भूमिका रुग्णालय प्रशासनानं घेतली होती. हे कळताच नांदगावकर यांनी तिथं जाऊन राडा केला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकांशी त्यांची शाब्दिक वादावादी झाली होती. सुरक्षा रक्षक त्यांच्या अंगावर धावूनही आले होते. त्याचा राग मनात धरूनच ही धमकी आली असावी, असं नांदगावकर यांनी पोलीस तक्रारीत नमूद केलं आहे. वाचा: 'यूपी, बिहारवाल्यांना तू काय समजतोस? तुझ्या घरात घुसून तुला तीन दिवसांत मारून टाकू. तुझ्या बायकापोरांना कापून टाकू. तू मला ओळखत नाहीस,' अशी धमकी संबंधित इसमानं दिली. ज्या मोबाइल नंबरवरून धमकी आली होती, तो मोबाइल नंबर (९९६७१००३३३) देखील नांदगावकर यांनी पोलिसांना दिला आहे. 'सामाजिक कामानिमित्त मी बराच वेळ घराबाहेर असतो. अशा वेळी माझ्या कुटुंबीयांना काही दगाफटका झाल्यास हा इसम जबाबदार राहील, असंही नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

https://ift.tt/3fau8np
July 21, 2020 at 09:12AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा