N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे पहाटे दीर्घ आजाराने निधन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
लखनऊ: मध्य प्रदेशचे राज्यपाल (Lalji Tandon)यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल टंडन आजारी होते. त्यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. लालजी टंडन यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री आशुतोष टंडन यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 'बाबूजी नही रहे' अशा शब्दात त्यांनी टंडन यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. (Governor ) काल रात्रीपासून राज्यपाल टंडन यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती नखनऊमधील मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली होती. टंडन यांची तब्येत खालावली असल्याचे ते म्हणाले होते. आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

https://ift.tt/3fcy07h
July 21, 2020 at 08:42AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा