N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
जयपूरः राजस्थानमधील सत्तासंघर्षात सोमवारी मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बंडखोर नेते यांच्यावर घणाघाती टीका केली. तर दुसरीकडे ३५ कोटींची ऑफर दिल्याच्या गहलोत गटातील आमदाराचा आरोप फेटाळून लावत सचिन पायलट यांनी मौन सोडले. पण ज्या आमदारांसाठी हा संघर्ष सुरू आहे त्यांची मनस्थिती काय आहे? हे समोर आलं नव्हतं. आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, असं पायलट समर्थक आमदार मुकेश भाकर यांनी सांगितलंय. तर हा संघर्ष फक्त राज्यातील नेतृत्वात बदल करून पक्ष वाचवण्यासाठी आहे, असं ते म्हणाले. सांगली: शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले. सांगली जिल्ह्यात पुणे-बेंगलोर महामार्गावर येलूर फाटा येथे दुधाचा टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले. मुंबई: 'सोहळ्याचे निमंत्रण येईल की, नाही माहीत नाही. तो काही आमच्या मानापनाचा विषय नाही, कारण आमचे नाते थेट श्रीरामाशी जोडलेले आहे,' अशी समजंस भूमिका शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मांडलेली असताना, 'अयोध्येला जाण्यासाठी पक्षप्रमुख यांना कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही,' असे वक्तव्य शिवसेना खासदार यांनी सोमवारी केली. पक्षाचे एक खासदार सर्व राजकारण बाजूला ठेवत समजंस भूमिका मांडत असताना, अन्य खासदार विनाकारण आक्रमक भूमिका मांडत राजकारण करीत असल्याबाबत आता शिवसेनेमधूनच नाराजीचा सूर आळवला जात आहे. मुंबई: पक्षाघातासाठी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या काही रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येत आहे. मात्र या रुग्णांना ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे पहिल्या टप्प्यात नसल्यामुळे या रुग्णांना लक्षणाधारित उपचार सुरू केले जातात व दोन दिवसांनी ताप, सर्दी तसेच इतर करोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या रुग्णांचे निदान करोनाबाधित असे होत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये पक्षाघाताची लक्षणे असलेल्या रुग्णासंदर्भात विशेष अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे. : आषाढ महिन्यातील शेवटचा रविवारी पुणेकरांनी मटण, मासळीसह चिकनवर ताव मारून साजरी केली. लॉकडाउनमुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी असली, तरी पुणेकरांनी ७५० ते ८०० टन चिकन, दीड ते दोन टन बोकड आणि ३ ते ४ टन मासळी फस्त केली. मात्र, मद्यविक्री बंद असल्याने अनेक तळीरामांना मात्र कोरडाच आखाड साजरा करण्याची वेळ आली.

https://ift.tt/3fcy07h
July 21, 2020 at 08:35AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा