N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

सावधान! करोनाची 'ही' चाचणी पॉझिटीव्ह रुग्णालाही दाखवते निगेटीव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यापासून आता जवळपास ६ महिन्यांचा काळ लोटला आहे. परंतु, एखाद्याला करोनाची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्याची सर्वात अचूक चाचणी कोणती आहे याबाबत आजही संशय आहे. हा संशय महाराष्ट्रातून पुढे आलेल्या माहीतीमुळे अधिकच घट्ट झाला आहे. याचे कारण म्हणजे एका चाचणीत रुग्णाची चाचणी निगेटीव्ह येते, तर दुसर्‍या चाचणीत तिच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह येते. याच कारणामुळे जलद प्रतिजैविक चाचणीच्या ( ) निकालावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या चाचणीमध्ये निगटीव्ह आढळलेले लोक चाचणी घेतात तेव्हा पॉझिटीव्ह आढळतात. महाराष्ट्रात अशी प्रकरणे वाढल्यानंतर तमिळनाडूसारखी राज्ये आरटी-पीसीआर चाचण्यांवर जास्त विश्वास ठेवू लागली आहेत. घाई करणे पडू शकते भारी अँटीजन टेस्टद्वारे रिपोर्ट जलद गतीने येत असल्यामुळे ही चाचणी करण्याकडे सर्वसाधारणपणे कल झुकत चालला आहे.या चाचणीमध्ये सुमारे एक तासात निकाल समोर येतोह. पण त्यात आरटी-पीसीआरपेक्षा संवेदनशीलता कमी आहे. त्यामुळे या निकालावर जास्त अवलंबून राहता येत नाही. मुंबईतील दोन प्रमुख प्रयोगशाळांमधील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोरोनाची लक्षणे असलेले ६५ टक्के रुग्ण अँटीजन चाचणीमध्ये निगेटीव्ही होते. मात्र, नंतर आरटी-पीसीआर चाचणीत तोच रुग्ण पॉझिटीव्ह आल्याचे स्पष्ट झाले. वाचा: दिल्लीत देखील झाली गडबड या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, १ जून ते २१ जुलै या कालावधीत दिल्लीत ३.६ लाख लोकांची घेण्यात आली. त्यापैकी केवळ ६ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. एकूण निगेटीव्ह व्यक्तींपैकी २,२९४ लोकांमध्ये नंतर मात्र करोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाली. मग त्यापैकी १५ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. वाचा: निकालाच्या अशा गोंधळामुळे तामिळनाडूमध्ये केवळ आरटी-पीसीआर चाचणीच घेतली जात आहे. तामिळनाडूत ११३ रूग्णालयांमध्ये दररोज एकूण ५० हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
July 26, 2020 at 09:12AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा