N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

मी शिस्तीच्या मागे उभा; उद्धव ठाकरेंचा तुकाराम मुंढेंना फुल सपोर्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: मी शिस्तीच्या मागे उभा आहे, असं सांगत मुख्यमंत्री यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त यांची पाठराखण केली. मात्र, कुणीही आततायीपणा करू नये, असं खडेबोलही त्यांनी सुनावले. नागपूर पालिकेतील लोकप्रतिनिधी विरुद्ध पालिका आयुक्त तुकाराम मुंढे असा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुंढे यांची हकालपट्टी करण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंढे यांची बाजू घेत त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. तुकाराम मुंढे नागपूर पालिकेत आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. त्यामुळे मी शिस्तीच्या पाठी आहे. एखादा अधिकारी कठोर असेलही. पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अंमलात आणले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरून चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्रालयाचं सचिवालय झाल्याच्या टीकेचाही समाचार घेतला. तसं बिल्कुल नाहीय. आणि समजा क्षणभर ते खरं मानलं तर धारावीचं कौतुक, राज्याचं कौतुक, सर्वोत्तम मुख्यमंत्री हे कौतुक होतंय. ते कौतुकास्पद काम नोकरशाहीने सरकारचं न ऐकता केलं आहे का? निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे हे मान्य, पण अंमलबजावणी सचिवांकडून करून घ्यायची असते. शेवटी यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ऑर्डरही तुम्हीच देणार आणि कामही तुम्हीच करणार, तर हे असं गव्हर्नमेंट असू शकत नाही, असं सांगतानाच सर्वच कामे तुम्हाला करायची असेल तर सचिवांची यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या. मंत्रालय की सचिवालय हा वाद हवा कशाला? सचिव पद्धतच बंद करून टाका. पिन टू पियानो म्हणजे ए टू झेड ऑर्डर पण तुम्हीच काढायची, कामं पण तुम्हीच करायची. मदतीचं वाटप वगैरे सगळं तुम्हीच करायचं, असा टोलाही त्यांनी लगावला.

https://ift.tt/3fau8np
July 26, 2020 at 10:16AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा