N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

शिवसेनेला आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न; उद्धव ठाकरे म्हणाले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: 'शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात पसरवायची आहे. आत्मनिर्भर करायची आहे, हे आपलं स्वप्न कायम आहे का?,' या प्रश्नाचं मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी 'सामना'ला दिलेल्या आगामी मुलाखतीत दिलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत, यावर राज्यातील महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार असल्यानं त्यांच्या या मुलाखतीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. (CM 's interview to Saamana) शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक () यांनी घेतलेली ही मॅरेथॉन मुलाखत २५ (उद्या) व २६ (रविवार) जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो राऊत यांनी आज ट्विट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'अनलॉक' मुलाखत असं याचं वर्णन राऊत यांनी केलंय. वाचा: शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला यापूर्वी अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. भाजपशी दुरावा आल्यानंतर शिवसेनेनं अनपेक्षितपणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली आणि नव्या सरकारचं नेतृत्व कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय अनुभव नसलेल्या उद्धव यांच्याकडं आलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे सध्या काम करत आहेत. सरकार चालवताना त्यांना स्वत:चा पक्षही वाढवायचा आहे. ते करताना मित्र पक्षांनाही दुखवायचं नाही. ही तारेवरची कसरत उद्धव कशी पार पाडणार आहेत, याचा खुलासा त्यांनी मुलाखतीमध्ये केला आहे. विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला तीनचाकी किंवा 'रिक्षा सरकार' असं म्हणून हिणवतात. त्यांच्या या टीकेला उद्धव यांनी 'ठाकरी' शैलीत उत्तर दिलं आहे. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तरी राष्ट्रीय मुद्द्यांवर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. केंद्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांशी दुरावा आल्यानंतर तर शिवसेनेच्या भूमिकेला अधिक महत्त्व आलं आहे. त्याच अनुषंगानं राऊत यांनी उद्धव यांना भारत-चीनच्या प्रश्नावरही बोलतं केलं आहे. त्यावर ते काय म्हणालेत हेही महत्त्वाचं ठरणार आहे. वाचा:

https://ift.tt/3fau8np
July 24, 2020 at 08:50AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा