N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

हिंदू असल्याचं सांगून जाळ्यात ओढले; मायलेकीच्या हत्येनंतर मृतदेह घरातच पुरले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मेरठ: मेरठमधील विवाहित महिला आणि तिच्या मुलीच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. महिलेच्या प्रियकरानंच हे भयानक हत्याकांड केलं. शमशाद यानं आपण हिंदू आहोत, असं सांगून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन ती त्याच्यासोबत राहू लागली. या मायलेकींची हत्या करून त्यांचे मृतदेह घरातच पुरले होते. पोलिसांनी घरात खोदकाम करून दोघींचे मृतदेह बाहेर काढले. शमशादनं गाझियाबादमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेला आपण हिंदू असल्याची बतावणी करून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. तिला एक मुलगीही होती. या दोघी त्याच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहत होत्या. त्यांच्या हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानंतर मेरठमध्ये एकच खळबळ उडाली. मायलेकीची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांना शमशादचा संशय आला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरात खोदलं. दोघींचेही मृतदेह आढळून आले. दरम्यान, मुख्य आरोपी शमशाद हा फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पोलीस अधिकारी आनंद मिश्रा यांनी सांगितलं की, आरोपी शमशादला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मंगळवारी त्याची चौकशी केली. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं. त्याच्या घरात खोदल्यानंतर दोघींचे मृतदेह आढळून आले. त्यावेळी तो पसार झाला. आरोपीचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंह यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या लोनी येथील रहिवासी प्रिया विवाहित होती. काही वर्षांपूर्वी प्रियाची ओळख भुडबराल येथे राहणाऱ्या शमशाद या तरुणाशी झाली. शमशादनं आपण हिंदू आहोत असं तिला सांगितलं. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. प्रियाची मुलगीही तिच्यासोबत राहत होती. शमशादनं तिचं नाव बदललं. दोघेही सोबत राहू लागले. शमशाद आणि महिला हे जवळपास पाच वर्षे एकत्र राहत होते. हिंदू नसल्याचं तिला समजलं तेव्हा... शमशाद हिंदू नसल्याचं तिला समजलं. यावरून प्रिया आणि त्याचं पटेनासं झालं. त्यांच्यात वाद होऊ लागले. २८ मार्चला शमशाद यानं दोघी मायलेकींची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह घरातच पुरले. त्या दोघी बऱ्याच दिवसांपासून कुठेच दिसल्या नाहीत म्हणून आजूबाजूच्या लोकांना संशय आला. त्यांनी शमशादकडे विचारणा केली. तर त्यानं नीट उत्तरे दिली नाहीत. त्यामुळं त्यांचा संशय बळावला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी आरोपीकडे अनेकदा चौकशी केली. मात्र, त्यानं पोलिसांना काहीही सांगितलं नाही. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं. संशय वाढल्यानं पोलिसांनी त्याच्या घरात खोदकाम केलं. त्यावेळी मायलेकींचे मृतदेह आढळून आले.

https://ift.tt/3fcy07h
July 23, 2020 at 11:54AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा