N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'मी इथेच बसलो आहे; मुलाखत सुरू असताना सरकार पाडा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: 'राज्यातील महाविकास आघाडीचं सरकारला पाडण्याची गरज नाही. ते आपोआप पडेल, अंतर्विरोधानं पडेल, अशी टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी हा इथे बसलेलोच आहे. माझं सरकार पाडून दाखवाच,' असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'ला मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेली ही २५ (उद्या) व २६ (रविवार) जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो राऊत यांनी आज ट्विट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'अनलॉक' मुलाखत असं याचं वर्णन राऊत यांनी केलंय. वाचा: यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, त्या एका पक्षाचे प्रमुख म्हणून होत्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. उद्धव हे सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राज्यातील सरकार चालवत आहेत. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारधारांचे असल्यानं हे सरकार किती दिवस टिकणार हा प्रश्न पहिल्या दिवसापासून उपस्थित केला जात आहे. विशेषत: विरोधी पक्ष भाजपकडून याबद्दल सातत्यानं वक्तव्य केली जात आहेत. हे तीन चाकांचे 'रिक्षा सरकार' आहे. हे अमर, अकबर, अँथोनी पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केली जात आहे. मध्य प्रदेशात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाल्यानंतर आणि राज्यस्थानात राजकीय पेच निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा जोरावर आहे. याच अनुषंगानं उद्धव ठाकरे यांना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिल्याचं मुलाखतीच्या प्रोमोतून दिसतंय. 'मी हा इथेच बसलोय. सरकार पाडून दाखवा. अगदी माझी मुलाखत सुरू असताना पाडा,' असं त्यांनी म्हटलंय. वयाच्या साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री आहे हा केवळ योगायोग आहे. याच'साठी' केला होता अट्टाहास, असा त्याचा अर्थ नाही. मी आजही माझी सही 'आपला नम्र' अशीच करतो, असं सांगत आपल्या खुर्चीचा मोह नाही, हे सांगण्याचा प्रयत्नही उद्धव यांनी केला आहे. शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचं, आत्मनिर्भर करण्याचं आपलं स्वप्न कायम आहे का? राष्ट्रीय राजकारणाकडं तुम्ही कोणत्या दृष्टीनं पाहता? या प्रश्नांची उत्तरंही उद्धव यांनी या मुलाखतीतून दिली आहेत. मुलाखतीच्या व्हिडिओ प्रोमोमुळं उत्सुकता वाढली आहे. वाचा: वाचा:

https://ift.tt/3fau8np
July 24, 2020 at 09:36AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा