N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
उल्हासनगर: करोना साथीच्या आजारामुळं घाबरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनःस्थितीचा फायदा घेत कोविडवरील इंजेक्शनचा काळा बाजार जोरात सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उल्हासनगरमध्ये अशाच प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. प्रयागराजः अयोध्येतील राम मंदिरा बांधण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन ( ) करण्यात येणार आहे. पण या भूमिपूजनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्राने करण्यात आली आहे. पत्राद्वारे केलेली याचिका जनहित याचिका म्हणून स्वीकारावी आणि भूमिपूजन कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. : करोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. यामध्ये पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गांचा समावेश नव्हता. मात्र, आता ऑनलाइन वर्गांमध्ये याही वर्गांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे लवकरच शिशू वर्ग, नर्सरीचेही भरण्याची शक्यता आहे. ठाणे: येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून केंद्रामध्ये नेत असताना दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सीसी कॅमेरे, पालिकेची सुरक्षा तसेच पोलिस बंदोबस्त असतानाही रुग्ण पळाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एकाचा शोध घेऊन त्याला रोबोडी केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या रुग्णाचा पोलिस शोध घेत आहेत.

https://ift.tt/3fcy07h
July 24, 2020 at 07:42AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा