N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

india-china clash: संरक्षण मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक; तिन्ही सैन्यदल प्रमुख, रावत उपस्थित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिन्ही सैन्यप्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक घेत आहेत. तिन्ही सैन्यदल प्रमुखांव्यतिरिक्त या बैठकीत संरक्षण प्रमुख (सीडीएस) बिपिन रावत सहभागी होत आहेत. या बैठकीत लडाखमधील परिस्थिती आणि एलएसीवरील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या पूर्वी देशाच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी चर्चा केलेली आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर देशाचे नौदल, हवाईदलही अॅलर्टवर आहेत. तिन्ही सैन्यदलांनी अलर्ट राहण्याबाबतचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल बिपिन रावत आमि तिन्ही सैन्यदल प्रमुखांमध्ये झालेल्या बैठकीत १८ जूनला घेण्यात आला. ३५०० किलोमीटरच्या चीनी सीमेवर भारतीय लष्कराची करडी नजर आहे. तिन्ही सैन्यदलांना हाय अॅलर्टवर ठेवण्यात आले आहे. चीनी लष्कराला कडक संदेश देण्यासाठी हिंदी महासागरात भारतीय नौदल आपली तैनाती अधिक वाढवत आहे. वाचा: या बरोबरच भारतीय लष्कराने पूर्वीच अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये एलएसीसह आपल्या सर्व प्रमुख फ्रंट लाइन ठिकाणावर अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. हवाई दलानेही पूर्वी पासूनच आपल्या सर्व फॉरवर्ड लाइन तळांवर एसएसी आणि सीमा भागावर नजर ठेवण्यासाठी अलर्टचा स्तर वाढवला आहे. वाचा: आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाच असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी म्हटले आहे. आमच्या क्षेत्रात आमचे सशस्त्र बल अष्टौप्रहर तयार आणि सतर्क असते. तसेच लडाखमध्ये एलएसीवर एका छोट्याशा आदेशावरही आम्ही परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहोत, असेही भदौरिया यांनी म्हटले आहे. वाचा: भारत आणि चीन या देशांदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लष्करापासून ते हवाई दलापर्यंत सर्व सैन्यदले अलर्टवर आहेत. बुधवारी रात्री उशिरा हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी लेह हवाई तळाचा दौरा केला. हवाई दल सध्या लेह-लडाख परिसरात अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

https://ift.tt/3fcy07h
June 20, 2020 at 08:35PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा