india-china clash: नरेंद्र मोदी हे वास्तवात 'सरेंडर मोदी' आहेत; राहुल गांधींचा घणाघात
N4U
२:५१ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष हे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि यांना सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी आहेत अशी टीप्पणी त्यांनी पंतप्रधानांवर केली आहे. एका ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी हे टीकास्त्र सोडले आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर जवानाच्या हौतात्म्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज नवे ट्विट करत त्यांनी पंतप्रधानांना 'सरेंडर मोदी' असे म्हटले आहे. राहुल गांधी जपान टाइम्समधील एक लेख शेअर करत ही टिप्पणी केली आहे. जपान टाइन्मने भारताचे विद्यमान धोरण हे चीनचे तुष्टीकरण करणारे असल्याचे म्हटले आहे. या पू्र्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला होता. आमच्या सीमेतही कुणी घुसखोरी केलेली नसून, आमची चौकीही कुणी ताब्यात घेतलेली नाही, असे वक्तव्य मोदी यांनी केले होते. लडाखमध्ये आमचे २० शूर जवान शहीद झाले, मात्र ज्यामंनी भारत मातेकडे डोळे वर करून पाहिले, त्यांना त्यांनी धडा शिकवला, असे मोदी म्हणाले होते. वाचा: पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ज्या ठिकाणी भारतीय जवान शहीद झाले ते ठिकाण, भूमी जर चीनची होती, तर मग आमच्या सैनिकांना का मारले गेले?, त्यांना कोठे मारले गेले?, असे प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ ४ राज्यांचे मुख्यमंत्री सरसावले लडाखमधील गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेससह इतर अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे सुरू केले आहे. काँग्रेस जवानांत्या हौतात्म्यावरून सतत मोदी सरकारला प्रश्न विचारत आहे. आपले जवान हा शहीद झाले, ते कोणाच्या भूमीत शहीद झाले, या प्रश्नांची उत्तरे मोदी देतील का असे पक्षाने मोदींना विचारले होते. तर आता वायएसआर काँग्रेस आणि तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. वाचा: सर्वपक्षीय बैठकीनंतर सुरू झालेल्या वादामुळे मी चिंतीत आहे असे आंध्र प्रदेशचे मुख्ममंत्री जगन मोहन रेड्डी ट्विट करत म्हटले आहे. ही वेळ एकजूट दाखवण्याची आहे, असे ते म्हणाले. तर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ही वेळ राजकारणाची नसून रणनीतीची आहे, असे ते म्हणाले. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
June 20, 2020 at 09:41PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा