लज्जास्पद! पत्नीला मित्राच्या हवाली केलं, खोलीत नेऊन केला बलात्कार
N4U
३:५१ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
अलवर: एका पत्नीचा सर्वात जास्त विश्वास आपल्या पतीवर असतो. मात्र, अलवरमधील घटनेनं या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पतीनं पत्नीला मित्राच्या हवाली केलं. मित्रानं त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. जिल्ह्यातील शाहजहाँपूर ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नराधम पतीनं आपल्या पत्नीला खोलीत नेलं. स्वतः दरवाजाबाहेर उभा राहिला. त्याच्या मित्रानं तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर, याबाबत कुठेही वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी या नराधमानं पत्नीला दिली. या घटनेनंतर शाहजहाँपूरमध्ये खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनंतर, पतीच्या मित्रानं बलात्कार केल्यानंतर महिलेनं त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर ती पीहर येथे गेली. घटनेनंतर पाचव्या दिवशी या प्रकरणी तिनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याचा मित्र मिच्चू उर्फ बलवंत याला अटक केली आहे. ३५ वर्षीय पीडित महिला हरयाणातील वडिलांना घेऊन पोलीस ठाण्यात आली आणि तिने पती आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह रावत यांनी दिली. फिरायला नेण्याच्या बहाण्यानं रचला कट १३ मे रोजी सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान पतीनं बाजारात फिरायला जायचं आहे असं तिला सांगितलं. मोटरसायकलवरून दोघेही घरातून निघाले. रस्त्यात त्याचा मित्र मिच्चू उर्फ बलवंत याला मोटरसायकलवर बसवलं. एका ठिकाणी असलेल्या घरात नेलं. तिथं बलवंत यानं तिच्यावर बलात्कार केला. पती स्वतः दरवाजाबाहेर उभा राहिला. या घटनेनंतर पतीनं तिला ठार मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर तिनं या नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी नराधम पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.
https://ift.tt/3fcy07h
June 20, 2020 at 11:22PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा