N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

लॉकडाउनमध्ये काम मिळेनासं झालं; टोळी बनवून करायचे लूटमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
गाझियाबाद: करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अनेकांच्या हाताला काम मिळणं बंद झालं. अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली. मात्र, काहींनी गुन्ह्याचा रस्ता अवलंबला. दिल्ली-एनसीआरमधील अनेक दारूच्या दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दारुच्या दुकानांमधून लाखो रुपये किंमतीचा मद्यसाठा चोरी करणाऱ्या सात जणांना सिहानी गेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील चोरीची दारू, नशेच्या ८०० गोळ्या, बंदूक आणि पाच चाकू तसेच अन्य शस्त्रे जप्त केली आहेत. सुमित उर्फ चिकना, विष्णू, कुलदीप, शाहिद, राजकुमार, चंद्रशेखर आणि राहुल अशी आरोपींची नावे आहेत. लॉकडाउनच्या काळात आमच्या हाताला काम मिळणे बंद झाले. आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळं सर्व जण लूट आणि चोरी करू लागले. , नोएडा, दिल्लीतील अनेक दारुच्या दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पाच पट किंमतीनं विकायचे चोरीची दारू पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी चोरीची दारू पाच पट अधिक किंमतीनं विकायचे. तर २० पट अधिक किंमतीनं नशेच्या गोळ्यांची विक्री करायचे. याशिवाय ही टोळी निर्जन ठिकाणी लोकांना लुटायचे. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून ते लोकांना धमकावायचे आणि त्यांच्याकडील सोनसाखळी आणि पैसे लुटायचे.

https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 12:09AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा