india-china clash: चीनी हल्ला पूर्वनियोजित होता; सरकार झोपेत होते- राहुल गांधींचे टीकास्त्र
N4U
१२:५१ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी खोऱ्यातील घटनेवरून आज सलग दुसऱ्या दिवशीही मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आता तर स्फटिकासारखं स्पष्ट आहे की गलवान खोऱ्यात चीनने केलाला हल्ला हा पूर्वनियोजित होता. चीनचे ही योजना पूर्वनियोजित असताना केंद्रातील सरकार मात्र गाढ झोपेत होते आणि आता हे सर्व ते नाकारत आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याची किंमत आमच्या शहीद जवानांना चुकवावी लागली, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार निष्काळजीणे वागल्याचे सूचित केले आहे. आज शुक्रवारी ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विट करत केंद्रावर टीका करत आहेत. कालही त्यांनी आपला एक व्हिडिओ ट्विट केला होता. निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल करतानाच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली अशी विचारणा राहुल गांधी यांनी या व्हिडिओद्वारे त्यांनी केली होती. वाचा: चीनने निशस्त्र भारतीय जवानांची हत्या करून एक फार मोठा अपराध केला आहे. या वीरांना कोणतीही हत्यारे न घेता धोका असलेल्या ठिकाणी कोणी पाठवले आणि का पाठवले?, याला कोण जबाबदार आहे, असे मी विचारू इच्छितो, असे राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. वाचा: यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांना ट्विटद्वारे उत्तर दिले होते. जे सत्य आहे ते व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. सीमेवर जेवढे सैनिक तैनात असतात, त्या सर्वांकडे शस्त्रे असतात, विशेषत: चौकीवरून निघताना. १५ जून या दिवशी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सर्वच सैनिकांकडे हत्यारे होती, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले होते. शस्त्रसंधीच्या वेळी हत्यारांचा उपयोग न करण्याची दीर्घ (सन १९६६ आणि २००५ चे करार) परंपरा असल्याची आठवणही त्यांनी राहुल गांधी यांना करून दिली होती. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
June 18, 2020 at 08:38PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा