india-china clash: आपल्या वक्तव्याचा देशाच्या हितावर काय परिणाम होतो याचा विचार करावा: डॉ. मनमोहन सिंह यांचा मोदींवर निशाणा
N4U
१०:५१ AM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान यांनी मोदी सरकारला चीनला योग्य ते उत्तर देण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांच्याव निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शब्दांचा आणि घोषणांचा देशाची सुरक्षा आणि सागरी, तसेच भूभागीय हितांवर काय प्रभाव पडत असतो याबाबत सावध असले पाहिजे असेही डॉ. सिंह म्हणाले. चीनने एप्रिल पासून ते आतापर्यंत खोरे आणि पँगाँग त्सो सरोवर भागात अनेकवेळा घुसखोरी केलेली आहे. गलवान खोऱ्यातील आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये असे डॉ. मनमोहन सिंह शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले. संपूर्ण देशाने एकजूट होऊन आणि संघटीत होऊन चीनने केलेल्या कुरघोडीला उत्तर दिले पाहिजे, असेही डॉ. सिंह म्हणाले. १५ आणि १६ जून या दिवसांमध्ये गलवान खोऱ्यात भारताच्या २० शूर जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. देशाच्या या सुपुत्रांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत देशाचे रक्षण केले. या सर्वोच्च त्यागासाठी आम्ही या शूर जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञ आहोत. मात्र, त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, असे डॉ. सिंह पुढे म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह पुढे म्हणाले की, आज आम्ही एका नाजूक वळणावर उभे आहोत. भविष्यातील आमच्या येणाऱ्या पिढ्या आमचे आकलन कसे करणार हे सरकारने आता घेतलेले निर्णय आणि सरकारने उचललेली पावले यावर ठरणार आहेत. जे देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यांवर कर्तव्याची मोठी जबाबदारी आहे. आमच्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. वाचा: आम्ही चीनच्या धमक्यांसमोर आणि दबावासमोर झुकणार नाही. तसेच आमची भूभागीय अखंडतेशी आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले. यांनी आपल्या वक्तव्यांमुळे त्यांचे कारस्थानी कारवायांना बळ देऊ नये आणि सरकारने या स्थितीचा सामना करावा. तसेच ही परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी परस्पर सहमतीने काम केले पाहिजे असेही सिंह म्हणाले. वाचा: संपूर्ण देशाने एक होऊन चीनच्या कारवायांना उत्तर देण्याची हीच वेळ असल्याचेही ते म्हणाले. भ्रामक प्रचार कोणत्याही रणनीतीचा आणि मजबूत नेतृत्वाचा पर्याय असू शकत नाही. मागे पुढे करणाऱ्या सहकाऱ्याद्वारे प्रचारित करण्यात येणाऱ्या असत्याने सत्य कधीही दाबले जाऊ शकणार नाही, असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी काढले. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 06:52PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा