N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

corona virus: पावसाळ्यात करोनाचा संसर्ग वाढेल?, की कमी होईल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: करोना विषाणूचा संसर्ग हा माणसापासूनच होत असतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच विषाणूचा संसर्ग संभव आहे. सुरू झाल्यानंतर आता तापमान कमी होणार आहे. अशात या संसर्गाचा व्यक्तीच्या शरीराच्या आतील किंवा बाहेरील तापमानाचा काही संबंध आहे का हा खरा प्रश्न आहे. माणसाच्या शरीराचे तापमान सुमारे ३७ डिग्री सेल्सियस इतके असते. मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो. हे तापमान कायमच असते. ऋतू कोणताही असो, व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते, त्यावेळी संसर्ग होत असतो. मात्र, अप्रत्यक्षपणे एखाद्या पृष्ठभागावर असेलल्या विषाणूचा जीवंत राहण्याचा कालावधी ताममान कमी झाल्याने वाढणार आहे हे नक्की. तामपानाचा या विषाणूच्या संसर्गावर काही परिणाम जाणवेल असे तज्ज्ञांना वाटत नाही. खोकल्यामुळेच होणार संसर्ग तापमान शून्याच्या खाली जावो अथवा ५० डिग्रीपर्यंत वाढो, करोना विषाणूचा संसर्ग मात्र संसर्ग झालेली व्यक्ती खोकल्यामुळेच होणार आहे हे नक्की. खोकल्यामुळे उडालेल्या सूक्ष्म थेंबांमध्ये विषाणू असतो. तो हवेत नसतो. करोनाचा विषाणू जर जमीनीवर पडल्यानंतर उन्हाळ्यात तो दोन दिवस जीवंत राहत असेल, तर हिवाळ्यात तो ४ दिवस जीवंत राहील. करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या ९० टक्के रुग्णांमध्ये झालेली लागण ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यानेच झालेली आहे. याच कारणामुळे मास्क वापरणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाचा: आता पावसाळा सुरू झाला असून या या काळात साथीचे आजारही सुरू होणार आहेत. मात्र आता ताप आली की तो करोनाचा संसर्ग झाल्यामुळेच आला असावा असे म्हणता येणार नाही. कारण या काळात सर्दी डोकेदुखी, ताप असे पावसाळ्यातील साथीचे आजारही सुरू होतात. शिवाय या काळात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे आजारही होत असतात हे पाहणेही महत्त्वाचे आहे. नव्या संशोधनानुसार या विषाणूचे रिसेप्टर्स केवळ नाकात नसून ते गळा, रेस्पिरेटरी टॅक्स्ट, अंडकोश अशा ठिकाणी देखील आहेत. या विषाणूची विकास प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळा असल्याचे संशोधकांना आढळले आहे. वाचा: ही सावधगिरी बाळगा आपले तोंड स्वच्छ धुवा, माउथवॉशने गुळण्या करा. तसेच मीठ आणि तुरटीच्या पाण्याने गुळण्या करणे सर्वात सुरक्षित समजले जाते. या बरोबरच व्यक्तीला दररोज ६ ते ८ तासांची झोप घेणेही आवश्यक आहे. दररोज कपडे बदलणे आवश्यक असून बाहेरचे आणि घरातील कपडे वेगवेगळे ठेवणे आवश्यक आहे. झिंक, ड जीवनसत्त्व आणि ओमेगा-३ या विषाणूला कमजोर बनवतात. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 05:35PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा