N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

earthquake: ईशान्य भारतातील ५ राज्यांना भूकंपाचे धक्के; ऐझॉल केंद्रबिंदू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
गुवाहाटी: ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये आज रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. आसामच्या गुवाहाटीसह , , आणि त्रिपुरापर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी नोंदवली गेली. आतापर्यंत भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू मिझोरामची राजधानी हे शहर होता. ऐझॉलपासून २५ किमी उत्तर-पूर्वेला असल्याचे सांगितले जात आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ३५ किमी खाली होते. ८ फेब्रुवारीला देखीला आला होता भूकंप, मेघालयात होते केंद्र या पूर्वी याच वर्षी ८ फेब्रुवारी रोजी आसाममध्ये ५ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. हा भूकंप , मेघालय, अरुणाचलसह इतर ईशान्येकडील राज्यामध्ये जाणवला होता. या भूकंपाचे केंद्र मेघालयातील तुरा येथून १०० किमीच्या अंतरावर उत्तर-पूर्व बाजूला होते. दिल्लीत दोन महिन्यांमध्ये आले १४ भूकंप तर दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांमध्ये सतत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची सुरुवात १२ एप्रिलपासून झाली. १२ एप्रिलला आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदवली गेली. तेव्हा पासून वेगवेगळ्या दिवशी एकूण १४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांना सहजपणे घेऊन चालणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे हे सतत बसणारे भूकंपाचे सौम्य धक्के पुढे येणाऱ्या मोठ्या भूकंपाचे संकेत असू शकतात, असे तज्ज्ञांना वाटते. या बरोबर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झारखंड आणि कर्नाटक राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. झारखंड आणि कर्नाटकत आलेले हे भूकंपाचे धक्के दोन शहरांमध्ये जाणवले. झारखंडच्या जमशेदपूर येथे या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी नोंदवली गेली. तर कर्नाटकातील हंपी येथे भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. हे भूकंपाचे धक्के शुक्रवार, ५ जूनला सकाळी ६. ५५ वाजता जाणवले.

https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 04:21AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा