चीनी आक्रमकतेला मिळणार सडेतोड उत्तर; सैन्यदलांना कारवाईची खुली सूट
N4U
७:५१ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि चीनदरम्यानचे संबंध अधिकच ताणले गेले असून देशभरात चीनविरोधी आक्रोश आहे. या पार्श्वभूमीवर यांनी चीनला कोणत्याही कारवाईविरोधात जशाच तसे उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला खुली सूट दिली आहे. चीनच्या कोणत्याही कारवाईनुसार उत्तर देण्याची सूट या पूर्वी देखील देण्यात आली होती. मात्र, चीनच्या प्रत्येक कारवाईला उत्तर देण्यासाठी लष्कराने आता तयार राहावे, असे संरक्षण मंत्री यांनी लष्कराला सांगितले आहे. चीनला लागलेल्या ३५०० किमीच्या सीमेवर तैनात जवानांना चीनच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या बैठकीनंतर सूत्रांनी सांगितले. या बैठकीत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरस एम. एम. नरवणे, नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आणि हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे उपस्थित होते. वाचा: प्रत्येत कारवाईवर बारीक नजर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या प्रत्येक हालचालींना उत्तर देण्यासाठी लष्कराने तयार राहावे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीत सांगितले. तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी चीनच्या प्रत्येक कारवाईवर करडी नजर ठेवावी, असे राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या सीमा, हवाई क्षेत्र आणि रणनीतिक सामुद्री मार्गांवर चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याचे आदेश संरक्षण मंत्र्यांनी दिले. जर चीनने कोणत्याही कारवाईसाठी भारताविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे तत्काळ उत्तर द्यावे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. वाचा: पँगाँग सरोवर परिसरात वाढू शकतो तणाव गलवान खोऱ्यात मनासारखे होऊ न शकल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. आता चीनने पँगाँग सरोवराच्या ८ किमीच्या अंतरापर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पुढील वाद हा पँगाँग सरोवरावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इथे ५ आणि ६ मे या दोन दिवसांमध्ये संघर्ष झाला आहे. मात्र, या वेळी पुन्हा असे झाल्यास तो संघर्ष धक्काबुक्की, दगडफेक आणि लाठ्यांपर्यंत मर्यादित राहणे कठीणच दिसत आहे. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 03:08AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा