काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पोलिसांनी दिली माहिती
N4U
७:५१ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
श्रीनगरः काश्मीरमधील ४ प्रमुख दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना ठार करण्यात पोलीस आणि सुरक्षा दलांना यश आलं आहे. लश्कर ए तोयबा, जैश ए मोहमद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अनसार गझवत उल हिंद या चार प्रमुख दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना ठार करण्यात यश आलं आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं लश्कर ए तोयबा, जैश ए मोहमद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि नसार गझवत उल हिंद या दहशतवादी संघटनांचे काश्मीरमधील म्होरके सुरक्षा दलांच्या कारवाईत गेल्या चार महिन्यांत ठार झालेत. काश्मीरच्या इतिहासात प्रथम असं घडलंय. याबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन आहे. म्होरके ठार झाल्याने दहशतवादी संघटनांना मोठा झटका बसला आहे, अशी माहिती विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रीनगरच्या जादिबल परिसरात आज तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. हे तीनही दहशतवादी स्थानिक होते. यामुळे परिसरातील प्रमुख व्यक्तींद्वारे त्यांना शरणागती पत्कारण्याचं आवाहन करण्यात आलं. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांनावर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर झालेल्या चकमकीत ते तिन्ही मारले गेले. यापैकी दोघांची ओळख पटली आहे, असं विजय कुमार म्हणाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचं नाव शाकूर फारूक लांगो असं होतं. तो श्रीनगरचा राहणारा होता. दुसऱ्याचं शाहिद अहमद भट्ट असं होतं. तिसऱ्याचं नाव कळू शकलेलं नाही. शाकूरने २० मे रोजी बीएसएफच्या जवानांची रायफल हिसकावली होती. त्याने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते. चकमकीत ठार झाल्यानंतर पोलिसांनी जवानाची हिसकावलेली रायफल जप्त केलीय. दहशतवादी फुरकानसाठी ड्रोनद्वारे शस्र पाकिस्तानने पाठवलेल्या ड्रोनमध्ये एके-४७, एम४ कार्बाइन आणि एक पिस्तुल आढळून आली. 'अली भाई'च्या नावाने पाठवण्यात आलेली ही शस्त्र पाकिस्तानी ड्रोनद्वारे दहशतवादी फुरकानसाठी पाठवली होती. फुरकान हा पुलवामाध्ये सक्रिय आहे, अशी माहिती विजय कुमार यांनी दिली.
https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 04:09AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा