N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

दहशतवादी घुसण्याची शक्यता, दिल्लीत हाय अलर्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे दिल्लीत पोलिसांना करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादी दिल्लीत घुसण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील काही दहशतवादी दिल्लीत घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. बस, कार आणि टॅक्सीद्वारे दिल्ली घुसण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. पोलिसांना माहिती दिल्यानंतर सर्व गेस्ट हाउस, हॉटेल्स आणि काश्मीरमधील नंबर प्लेटच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीतील सर्व बस स्थानकं आणि रेल्वे स्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीच्या बाह्य भागात असलेल्या उत्तर जिल्ह्यातील भागांवर पोलिसांचं विशेष लक्ष आहे. जम्मू-काश्मीरमधून ४ ते ५ दहशतवादी दिल्लीला येण्यासाठी ट्रकमधून रवाना झाले आहेत. गुप्तचर विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत मोठी हिंसा घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. यामुळे दिल्लीतील सर्व जिल्ह्यांची डीसीपी, स्पेशल सेल, क्राइम ब्रांच स्पेशल ब्रांच आणि इतर विभागांना अलर्ट करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार दरम्यान, दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियाँ जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार केलं. या नंतर श्रीनगरच्या जादिबलमध्ये शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं.

https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 02:42AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा