N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

बलात्कारानंतर MMS बनवला; तरुणीचा क्रिकेटपटूवर आरोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
ग्रेटर नोएडा: क्रिकेट विश्वातील दिग्गजांशी भेट घालून देतो अशा भूलथापा देऊन बलात्कार केल्यानंतर एमएमएस केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील नोएडामधील बिसरख कोतवाली हद्दीत घडली. बलात्काराचा आरोप झालेला तरूण हा दिल्लीतील रणजी क्रिकेटपटू असल्याची माहिती समजते. या घटनेला वर्ष उलटून गेलं तरी, पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. तसंच एफआयआर दाखल करण्यासाठी गेल्यानंतर मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. तसंच आठ दिवस पोलीस ठाण्यात ठेवलं, असा आरोप पीडितेनं केला आहे. पीडितेनं ट्विट करून आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता मूळची आग्रा येथील आहे. ती मुंबईतील मीरा रोडमधील कुटुंबासममवेत राहते. दिल्लीतील एका रणजी क्रिकेटपटूनं सोशल नेटवर्किंग साइटवरून मैत्री केली. त्यानंतर क्रिकेटविश्वातील दिग्गज खेळाडूंची ओळख करून देतो अशी बतावणी करून दिल्लीला बोलावून घेतले. त्यानंतर ग्रेटर नोएडातील बिसरख कोतवाली हद्दीत नेलं. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर एमएमएस तयार केला. व्हिडिओ असल्याचे सांगून ब्लॅकमेल केले आणि अनेकदा बलात्कार केला. बऱ्याच दिवसानंतर मुंबईतील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण ग्रेटर नोएडाच्या बिसरख ठाण्यात वर्ग करण्यात आला. 'बिसरख पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून आठ दिवस पोलीस ठाण्यात ठेवलं. तसंच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला,' असा आरोप पीडितेनं केला आहे. आरोपीची एक मैत्रीण आणि तिचा साथीदार वारंवार फोन करून धमकावत आहेत. त्याचे रेकॉर्डिंगही तिनं पोलिसांना दिलं आहे. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही. याबाबत डीसीपी (महिला सुरक्षा) वृंदा शुक्ला यांनी सांगितलं की, एक क्रिकेटर, त्याची मैत्रीण आणि एका साथीदाराविरोधात पीडितेनं तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तर पोलीस ठाण्यात ठेवून दबाव आणला जात असल्याचा तिचा आरोप चुकीचा आहे.

https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 01:31AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा