धक्कादायक! उत्तर प्रदेशात धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार
N4U
१०:५१ AM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

नोएडा: उत्तर प्रदेशात धावत्या बसमध्ये एका झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला प्रतापगडहून बसमधून नोएडाला जात होती. तिच्यावर धावत्या बसमध्ये चालकाने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बसचालकाला अटक केली आहे. तसेच बसही जप्त केली आहे. प्रतापगडची राहणारी एक महिला आपल्या दोन मुलांसोबत गौतम बुद्ध नगर येथे जात होती. प्रतापगडहून मंगळवारी रात्री ती एका डिलक्स बसमध्ये बसली. बसचालकाने केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने प्रतिकार केला असता, तिला बसमधील सहचालकाने धमकावले असे तिने सांगितले, अशी माहिती पोलीस उपायुक्त वृंदा शुक्ला यांनी दिली. आरोपींनी तिला सेक्टर २७मधील एका रुग्णालयाजवळ बुधवारी सकाळी बसमधून उतरवले आणि पसार झाले, असे पीडितेने पोलिसांना सांगितले. ही महिला बसमधील सर्वात मागील आसनावर बसली होती. रात्रीची वेळ असल्याने बसमधील इतर प्रवासी झोपले होते. त्यामुळे त्यांना घटनेबाबत काहीही माहिती नाही असे तिचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या महिलेला रुग्णालयात नेले. तिथे महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच बसचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अद्याप पसार आहे, असेही पोलिसांनी सांगितले. नेमकं काय घडलं? पीडित महिला मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास प्रतापगडहून नोएडा येथे जाण्यासाठी एका खासगी डबल डेकर बसमध्ये चढली. तिच्यासोबत दोन मुलेही होती. तिचा पती नोएडा येथे नोकरी करतो. बसमध्ये ती मुलांसह फ्रंट स्लीपर सीटवर बसली होती. साधारण आठ वाजताच्या सुमारास सहचालक आणि वाहकाने तिच्याकडे या सीटसाठी ५०० रुपयांची मागणी केली, अन्यथा त्या सीटवरून उठण्यास सांगितले. मात्र, नोएडाला पोहोचल्यानंतर मी पैसे देईन असे महिलेने त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी पैसे लगेच द्या असा आग्रह धरला. शेवटी महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसच्या मागील सीटवर जाऊन बसली. अचानक तिला आणि मुलांना झोप लागली. पहाटे साडेतीनच्या सुमारास तिला जाग आली. त्यावेळी बसमधील सहचालक तिच्याजवळ झोपला होता. ते पाहून तिला धक्काच बसला. मी आरडाओरडा करताच, त्यांनी माझे हात ओढणीने बांधले आणि माझे तोंडही दाबले. माझ्यावर बलात्कार केला. कुणाकडे वाच्यता केली तर ठार मारेन असे धमकावले. त्यामुळे महिला गप्प बसली. तिची दोन्ही मुले झोपली होती. घटना घडली त्यावेळी बसमधील इतर प्रवासी गाढ झोपेत होते. सहचालक आणि वाहकाने तिला धमकावले. पैसे घे आणि हे प्रकरण मिटवून टाक असे त्यांनी सांगितले.
https://ift.tt/3fcy07h
June 17, 2020 at 06:41PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा