सीमा रक्तपात : चीनी सैनिकांचा कमांडिंग ऑफिसरही ठार
N4U
३:५१ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

नवी दिल्ली : लडाखच्या खोऱ्यात () सोमवारी मध्यरात्री झालेल्या हिंसक झटापटीत (india china border news latest updates) भारताचे २० जवान हुतात्मा झाले आहेत. या घटनेत चीनलाही मोठं नुकसान सोसावं लागल्याचं समोर येतंय. चीनच्या जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या जवानांची संख्या जवळपास ४३ असल्याचं सांगण्यात येतंय. चीनच्या मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांममध्ये सेनेचा कमांडिंग ऑफिसर असल्याचंही समजतंय. उल्लेखनीय म्हणजे, चीननं अद्याप आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांबद्दल किंवा जीवितहानीबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. ही घटना घडली तेव्हा चीनचा कमांडिंग ऑफिसर आपल्या तुकडीचं नेतृत्व करत होता. त्याचाही या हिंसक हाणामारीत मृत्यू झाला. () दुसरीकडे या घटनेत भारताचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांचादेखील मृत्यू झाला. वाचा : वाचा : सूत्रांच्या माहितीनुसार, या हिंसक झटापटीनंतर चीनला मोठं नुकसान झालंय. चीनी सीमेवर स्ट्रेचर, अॅम्ब्युलन्सदारे जखमी आणि मृत सैनिकांना घेऊन जाताना हालाचली वाढलेल्या दिसून आल्या. गलवान नदीजवळही चीनी हेलिकॉप्टरच्या हालचालींना वेग आलेला दिसला. यापूर्वी मंगळवारी चीन वर्तमानपत्र 'ग्लोबल टाईम्स'नंही चीनमध्ये या घटनेत जीवितहानी आणि नुकसान झाल्याचं स्वीकार केलंय. परंतु, संख्या सांगण्यास मात्र नकार देण्यात आला. शिवाय चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानंही कोणताही आकडा अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही. वाचा : वाचा : दुसरीकडे, भारतीय लष्कराकडून पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारी भारतीय सेनेचे २० जवान हुतात्मा झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलंय. या हल्ल्यात १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, तामिळनाडूच्या रामानाथपुरम जिल्ह्याचे रहिवासी जवान के पलानी तसंच झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील डिहारी गावाचे कुंदन ओझा यांनाही हौतात्म्य आलं. त्यानंतर, उंचावरच्या गलवान हाणामारीत गंभीररित्या जखमी झालेल्या १७ जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आलं. परंतु, उंचावरच्या ठिकाणच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
June 16, 2020 at 11:26PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा