N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

राहुल गांधींच्या 'सरेंडर मोदी' टीकेला आठवलेंचं खणखणीत उत्तर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

मुंबई: 'पंतप्रधान हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत,' अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन नेते यांनी काँग्रेस नेते यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 'संपूर्ण देशात मोदींची हवा असल्यानं राहुल गांधी त्रस्त आहेत,' असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचा: भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावरून सध्या काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरलं आहे. राहुल गांधी सीमेवरील संघर्षाबाबत रोजच्या रोज सरकारला नवनवे प्रश्न विचारत आहेत. 'जपान टाइम्स'मधील एका लेखाचा हवाला देत राहुल यांनी मोदी यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होती. भाजपमधून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राहुल गांधी यांनी सर्व मर्यादा तोडल्या आहेत. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपनं केली होती. त्यानंतर आता भाजपच्या मित्र पक्षाचे नेते असलेल्या आठवले यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 'राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अशा प्रसंगी सर्व राजकीय पक्षांनी पंतप्रधानांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजचा भारत १९६२ सारखा राहिला नाही हे चीनने ध्यानात घ्यावे, असंही ते म्हणाले. 'काँग्रेसनं ठाकरे सरकारमधून बाहेर पडावं' राज्यात सध्या सुरू असलेल्या थोरात-विखे वादावरही त्यांनी भाष्य केलं. 'महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही. काँग्रेसला वारंवार अपमान सहन करावा लागत आहे. हे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर टिकलं आहे. त्यामुळं काँग्रेसनं अधिक अपमान सहन करता सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला त्यांनी दिला. 'विखे-पाटील यांना मी चांगलं ओळखतो. ते भाजपमध्ये अस्वस्थ नाहीत, असं ते म्हणाले. वाचा: थोरातांची कुरबूर काँग्रेसच्या नाराजीबद्दल भाष्य करताना, शिवसेनेच्या मुखपत्रातून अलीकडेच 'जुन्या खाटेची कुरकुर' असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता, 'थोरात यांची कुरकुर नाही, कुरबूर सुरू आहे,' असं आठवले आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले.


June 22, 2020 at 04:59PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा