N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

करोना: देशात २४ तासांत वाढले ४८,६४८ रुग्ण, मात्र सोबत 'ही' गुडन्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: देशातली दररोज आढळणाऱ्या करोनाच्या () रुग्णांची संख्या ५० हजार हजारांच्या आसपास पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Minstry) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशभरात एकूण ४८ हजार ६४८ करोनाचे नवे रुग्ण आढळले. या बरोबरच देशात एकूण रुग्णांची संख्या ८० लाख ८८ हजार ८५१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच या महासाथीने आतापर्यंत एकूण १ लाख २१ हजार ०९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे पाहता सक्रिय रुग्णांच्या संख्येत सतत घट होत असल्याची दिसत असल्याने दिलासा मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९,३०१ ने कमी झाली आहे. या बरोबरच देशभरात केवळ ५ लाख ९५ हजार ३८६ इतकी सक्रिय रुग्णांची संख्या झाली आहे. देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून ही संख्या ७३ लाख ७३ हजार ३७५ वर पोहोचली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यात ५७ हजार ३८६ रुग्णांना गेल्या २४ तासांमध्ये घरी सोडण्यात आले आहे. आणखी एक खूशखबर म्हणजे, पॉझिटिव्हीटीचा दर. भारतात सतत पॉझिटीव्हीटीचा दर घटत आहे आणि सध्या हा दर ७.५४ टक्के इतका आहे. करोना विरोधातील या लढाईत चाचण्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. याच कारणामुळे सरकार चाचण्यांवर विशेष जोर दिला आहे. काल २९ ऑक्टोबरला करोना विषाणूचे एकूण १० कोटी, ७७ लाख २८ हजार ८८ नमूने तपासण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिली आहे. यां पैकी ११ लाख ६४ हजार ६४८ नमूने कालच्या दिवसात तपासण्यात आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- दिल्लीसह देशातील पाच राज्यांमधील करोनाची स्थिती एक डोकेदुखी ठरली आहे. रोज वाढणाऱ्या करोना रुग्णांमध्ये या पाच राज्यांमधील रुग्णांची संख्या अधिक आहे. दिल्लीत बुधवारी सर्वात प्रथम पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. गुरुवारी देखील अशीच स्थिती होती. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
October 30, 2020 at 11:37AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा