बिहार निवडणूक: आता नीतीश कुमारांनी फेकला 'लोकसंख्येनुसार आरक्षणाचा' फासा
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
पाटणा: बिहारच्या राजकीय रणभूमीत () आता आरक्षणाचा (Caste Reservation) मुद्दा आला आहे. जातींच्या लोकसंख्येनुसार मिळायला हवे, असे () यांनी म्हटले आहे. जातींना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळावे हे आपले सुरुवातीपासूनचे मत असून त्यावर आपण कायम असल्याचे नीतीश कुमार म्हणाले. (nitish kunar says castes should get in proportion to their ) बिहारच्या रणभूमीत पक्ष मतासाठी जीवतोड प्रयत्न करत आहेत. रोजगार आणि कायदा आणि सु्व्यवस्थेसह घोटाळ्यांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र आता राजकीय हत्यारे वापरून पाहण्याची पाळी आली आहे आणि नीतीश कुमार यांनी आरक्षणाचा फासा फेकला आहे. लोकांना त्यांच्या जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळायला हवे, असे नीतीश कुमार यांनी वाल्मीकीनगर येथे म्हटले. वाल्मीकीनगरात थारू जातीचे मतदार मोठ्या संख्येने आहेत आणि ही समाज आपला जमातीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करत आहे. याच मागणीवर बोलताना जनगणना करणे हे आमच्या हातात नाही, असे नीतीश कुमार म्हणाले. मात्र जातींच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे आणि यात कोणतेही दुमत नसल्यातचे ते म्हणाले. थारू समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे नीतीश कुमार म्हणाले. आपण अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री असल्यापासून यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. खरे तर नीतीश कुमार येथे प्रचाराला आले तेव्हाच त्यांच्यापुढे थारू समाजाने आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या दरम्यान आरक्षणाचा मुद्दा देखील उचलला गेला आहे. आता या मुद्द्यावर कोणता पक्ष कोणाला मात देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
October 30, 2020 at 09:14AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा