N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला करोनाची लागण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबईः राज्यात करोना संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश येत असलं तरी राज्यातील लोकप्रतिनिधींना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार यांनाही करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेते व सरकारमधील मंत्र्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. शिवसेना नेता एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांनाही करोनानं ग्रासलं होतं. पण, योग्य उपचारांनंतर या मंत्र्यांनी करोनावर मात करून पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोना चाचणीसंदर्भात माहिती देताना तटकरे यांनी एक ट्विट केलं आहे. ' काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे,' अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्याशिवाय, 'आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशिर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात करोनाचा संसर्गा वाढत असताना व लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघात प्रत्यक्ष कामं केली होती. तसंच, तटकरे यांनी कोव्हिड रुग्णालयांची पाहणीसाठी त्यांनी केली होती. त्याचबरोबर, रायगडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकारणीच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते.

https://ift.tt/3fau8np
October 27, 2020 at 12:45PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा