N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'मनुस्मृती' प्रकरण तापले, भाजप नेत्या खुशबू सुंदर पोलिसांच्या ताब्यात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
चेन्नई: तामिळनाडूत विदुथलई चिरुथैगल काच्ची पक्षाचे (Viduthalai Chiruthaigal Katchi party) प्रमुख टी. तिरुमावलवन () यांनी मनुस्मृतीवर केलेल्या वक्तव्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. तिरुमावलवन यांच्या वक्तव्यावर राज्यात विरोध होऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या यांना पोलिसांनी चेंगलपट्टू जिल्ह्यात ताब्यात घेतले आहे (khushboo sundar detained). त्या तिरुमावलवन यांच्या मनुस्मृतीवरील टिप्पणीचा विरोध करण्यासाठी जात होत्या. खुशबू सुंदर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. (bjp leader by ) हा ग्रंथ महिलांचा अपमान करत असून त्यांना खालचे स्थान देते असे वक्तव्य व्हीसीके प्रमुख यांनी केले होते. मनुचा धर्म महिलांशी केवळ उपभोगाची वस्तू अर्थात शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या रुपात व्यवहार करतो. या कारणामुळे मनुस्मृतीवर बंदी आणली पाहिजे, असे वक्तव्य टी. तिरूमावलवन यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान केले होते. याला विरोध दर्शवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने कुड्डलोर येथे निदर्शनांचे आयोजन केले होते. हे आयोजन खुशबू सुंदर यांच्या नेतृत्वात होणार होते. कुड्डलोरला जात असतानाच पोलिसांनी खुशबू सुंदर यांना ताब्यात घेतले. तुरुमावलवन यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. तिरुमावलवन यांच्या या वक्तव्यामुळे जातीय तणाव वाढू शकतो, असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे. मात्र, आपल्या वक्तव्यावर टी. तिरूमावलवन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण केवळ मनुस्मृतीचा हवाला दिला होता. मनुस्मृतीवर बंदी घातली गेली पाहिजे. भारतीय जनता पक्ष जातीय तणावाला उत्तेजन देण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत आहे, असे तिरूमावलवन यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- व्हीसीके प्रमुख तिरूमावलवन यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात डीएमके, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
October 27, 2020 at 12:28PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा