आम्ही नाही, चीननेच LAC वर केला गोळीबार; भारताकडून चीनची 'पोलखोल'
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: लडाखमध्ये () सीमेवर भारताने गोळीबार केल्याचा चीनचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. भारताकडून गोळीबार करण्यात आलेला नाही, असे उत्तर भारतीय लष्कराने दिला आहे. भारताने कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा () ओलांडली नसून, सीमेवर शांतता राहावी असाच भारताचा प्रयत्न असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ७ सप्टेंबरच्या रात्री पीएलएने भारतीय सैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, पीएलएनेच () हवेत गोळीबार केला असा आरोप करत भारताने गोळीबार केलेला नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. (china face off to intimidate own troops says ) चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला असताना देखील भारतीय सैनिकांनी संयम बाळगला असल्याचे भारताकडून सांगण्यात येत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी सतत सहमतीचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही भारताने केला आहे. भारताने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चीन सतत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सहमतीचे उल्लंघन करत असून सतत भारताला डिवचले जात आहे. ७ सप्टेंबरला चीनी सैनिकांनी आमच्या फॉरवर्ड पोझिशनजवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने चीनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला. इतके डिवचल्यानंतर देखील भारतीय सैनिकांनी संयम बाळगला आणि परिपक्वतेचे दर्शन घडवले. चीनच्या पश्चिमी कमांडरने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांनी दिशाभूल करण्याच्या उद्देशाने आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. एकीकडे चर्चा, दुसरीकडे कुरघोडी भारताने आपल्या निवेदनाद्वारे चीनचे दुटप्पी धोरण उघड केले आहे. एकीकडे भारत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे चीन मात्र जाणूनबुजून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे, असे भारताने म्हटले आहे. भारतीय सैनिकांनी कधीही गोळीबार केलेला नसल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. वाचा- ४५ वर्षांनंतर झाला गोळीबार सन १९७५ मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशात आसाम रायफल्सच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. त्यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शेवटचा गोळीबार झाला होता. त्या पूर्वी सन १९६७ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनी सैनिकांमघ्ये सिक्कीममध्ये गोळीबार झाला होता. वाचा- वाचा-
https://ift.tt/3fcy07h
September 08, 2020 at 11:16AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा