N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

कंगनाच्या 'वाय प्लस' सुरक्षेवर खासदार महुआ मोइत्रा यांचं प्रश्नचिन्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार (TMC MP ) यांनी सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री हिला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरवण्यात आलेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यावरूनच मोइत्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. 'स्त्रोतांचा / यंत्रणांचा योग्य वापर' करण्यावरून महुआ मोइत्रा यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. 'मणिकर्णिका' फेम बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात वारंवार महाराष्ट्रातील शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारवर हल्ले करताना दिसतेय. एवढचं नाही तर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत कंगनानं मुंबईच्या कायदे-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरूनच महुआ मोइत्रा यांनी कंगनावर जोरदार हल्ला करत तिला 'बॉलिवूड ट्विटराटी' नाव बहाल केलंय. 'बॉलिवूडच्या ट्विटराटींना का पुरवली जातेय, जेव्हा भारतात पोलिसांचं प्रमाण लोकसंख्येमागे प्रतीलाख १३८ असताना आहे आणि भारताचा क्रमांक ७१ देशांच्या यादीत शेवटच्या पाच देशांमध्ये लागतो? स्रोतांचा आणखी काही चांगला वापर होऊ शकत नाही का, माननीय गृहमंत्री?' असं ट्विट महुआ मोइत्रा यांनी केलंय. वाचा : वाचा : उल्लेखनीय म्हणजे, अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेचे खासदार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि मीडियाच्या माध्यमातून शाब्दिक चकमक सुरू आहे. यातच संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी देण्याचा आरोप कंगनानं केला. तर 'कंगनाची हिंमत असेल तर तिनं अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणून दाखवावं' असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिलं. त्यानंतर थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी कंगनाला सीआरपीएफची वाय प्लस सुरक्षा देण्यात आली. अशी सुरक्षा मिळालेली कंगना ही पहिलीच बॉलिवूड स्टार ठरलीय. सध्या, कंगना रानौत हिमाचल प्रदेशातील आपल्या घरीच आहे. कंगनाच्या सुरक्षेत एक खासगी सुरक्षा अधिकारी तसंच कमांडोजसहीत ११ हत्यारधारी पोलीस अधिकारी तैनात असतील. उल्लेखनीय म्हणजे, या दर्जाची सुरक्षा भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांना मिळालेली आहे. केंद्राकडून कंगनाला सुरक्षा देण्याच्या निर्णयावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 'मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या लोकांना केंद्राकडून सुरक्षा देणं हैराण करणारं आणि दु:खी करणारं आहे. हे राज्य सर्वांचं आहे आणि भाजपचंही आहे. कंगना रानौतच्या वक्तव्याची सर्वांनीच निंदा करायला हवी होती' असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
September 08, 2020 at 11:17AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा