N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'विमानतळं, रेल्वे विकून बैलगाड्या विकत घ्यायचा प्लान आहे का?'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: , रिया चक्रवर्ती आणि ह्या सगळ्या वादातून बाहेर पडा आणि आजूबाजूला असलेल्या गंभीर समस्यांची दखल घ्या,' असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व ज्येष्ठ विधीज्ञ यांनी सर्व संबंधितांना केलं आहे. या निमित्तानं त्यांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयावरही तोफ डागली आहे. कंगना राणावतच्या बेताल बडबडीवरून सध्या राजकारण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपचे नेते कंगनाच्या बाजूनं थेट वक्तव्य करून वातावरण तापवत आहेत. मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगनाला 'वाय' सेक्युरिटी देण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर माजिद मेमन यांनी ट्वीट करून चिंता व्यक्त केली आहे. वाचा: 'सुशांत, रिया आणि कंगना यातून बाहेर या आणि आपल्या आसपास असलेल्या अधिक गंभीर समस्यावर लक्ष द्या. या समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांच्या अवस्थेकडे बघा,' असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे. विमानतळांचे लिलाव सुरू आहेत. रेल्वे मार्गांचे खासगीकरण सुरू आहे. यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विमानतळं व रेल्वे विकून मोठ्या प्रमाणात बैलगाड्या खरेदी करण्याची केंद्र सरकारची योजना आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सत्तेत असलेल्यांना देश मागे न्यायचा आहे. ते सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. पैशाच्या जिवावर मजा मारत आहेत,' असं त्यांनी म्हटलं आहे. कंगनालाही सुनावले माजिद मेमन यांनी मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगनालाही नाव न घेता सुनावले आहे. 'मुंबई आणि महाराष्ट्र हे पाकव्याप्त काश्मीरसारखं आहे आणि इथं राज्य करणारे तालिबानी आहेत असं ज्यांना वाटतं, त्यांनी स्वत:हून या धोकादायक ठिकाणांपासून दूर राहायला हवं,' असा टोला त्यांनी हाणला आहे. 'भारतीय जनता पक्ष अशा लोकांच्या वक्तव्यांना पाठिशी घालत असून लोकांच्या पैशाने त्यांना सुरक्षा पुरवत आहे,' असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. वाचा:

https://ift.tt/3fau8np
September 08, 2020 at 08:17AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा