काँग्रेसमध्ये फुटला आणखी एक 'लेटर बॉम्ब', 'घराणेशाहीच्या मोहातून बाहेर पडा', सोनियांना आवाहन
N4U
६:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
लखनउः कॉंग्रेसमधील कलह लवकर संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत नाहीए. कारण कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या 'लेटर बॉम्ब' नंतर आता आणखी एक 'लेटर बॉम्ब' फुटण्याची शक्यता आहे. यावेळी ते उत्तर प्रदेशचे आहे. गेल्या वर्षी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या नऊ नेत्यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेस पक्षाला 'इतिहासजमा' होण्यापासून वाचवा. घराण्याच्या मोहातून बाहेर पडून पक्षासाठी काम करावं, असं आवाहन या नेत्यांनी पत्रातून केलं आहे. उत्तर प्रदेशातील माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांची स्वाक्षरी असलेलं हे पत्र आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसच्या सर्वात वाईट काळातून जात आहे, असं या नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे. प्रियांका गांधींवर निशाणा यूपी प्रभारी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत असलेल्या या चार पानांच्या पत्रात सोनिया गांधी यांना घराणेशाहीतून वर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'घराण्याच्या मोहातून बाहरे या' आणि पक्षातील लोकशाही परंपरा पुन्हा स्थापन करा, असं आवाहन पत्रात करण्यात आलं आहे. 'पगारी काम करणाऱ्या नेत्यांचा कॉंग्रेसवर कब्जा' राज्याच्या कारभाराची जबाबदारी असलेल्या नेत्याकडून वस्तूस्थिती सांगितली जात नाहीए. आम्ही जवळजवळ एक वर्षापासून आपल्या भेटीची मागणी करत आहोत. पण नकार दिला जात आहे. आम्ही पक्षातून केलेल्या हकालपट्टी विरोधात आम्ही अपील केले होते. ही कारवाई बेकायदेशीर होती. पण केंद्रीय शिस्त पालन समितीलाही आमच्या अपिलावर विचार करण्यासाठी वेळ नाहीए, अशी व्यथा नेत्यांनी पत्रातून मांडली आहे. पगारी काम करणारे आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नसलेल्यांनी पक्षाच्या पदांवर कब्जा केला आहे. हे नेते पक्षाच्या विचारसरणीशी परिचित नाहीत. तरीही उत्तर प्रदेशात पक्षाला दिशा देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले असल्याचे पत्रात म्हटले आहे. १९७७-८० च्या संकटादरम्यान आम्ही काँग्रेस पक्षासाठी पहाडा सारखे उभे होतो. पण आता लोकशाही मूल्य पायदळी तुडवले जात आहेत. ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांचा अपमान केला जात आहे आणि त्यांची हकालपट्टी केली जात आहे. पक्षातून आमची हकालपट्टी करण्यात आल्याचं आम्हाला माध्यमांमधून कळलं. नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाचा अभाव आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. पक्षातील वसूस्थितीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या यूपीमध्ये कॉंग्रेसचे मोठे नुकसान होईल, असा इशारा या नेत्यांनी पत्रातून दिला आहे. उत्तर प्रदेशात पक्षात गटबाजी आणि मतभेद वाढले असताना हे पत्र समोर आले आहे.
https://ift.tt/3fcy07h
September 06, 2020 at 05:12PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा