N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

करोना: बाधितांची संख्या ४१ लाखांवर; एकाच दिवसात आढळले ९० हजार रुग्ण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: भारतात एकाच दिवसांत ९० हजार करोनाबाधित आढळले आहेत. या नवीन करोनाबाधितांच्या संख्येमुळे आता भारतात ४१ लाखांहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. तर, दुसरीकडे मागील २४ तासांमध्ये ७० हजारांहून अधिक करोनााबाधितांनी आजारावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ इतके बाधित आढळले. तर, एक हजार ६५ जणांचा मृत्यू झाला. भारतात एकूण ४१ लाख १३ हजार ८१२ इतकी करोनाबाधितांची संख्या झाली आहे. करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत ७० हजार ६२६ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची संख्या आता ४१ लाखांहून अधिक झाल्यामुळे सर्वाधिक बाधितांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर भारत येण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका आणि ब्राझील हे सर्वाधिक करोनाबाधितांच्या संख्येत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ६१ लाखांहून अधिक झाली आहे. तर, एक लाख ८६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही अधिक नवीन करोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवासांत ब्राझीललाही भारत मागे टाकू शकतो. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये सध्या ४१ लाख २३ हजार करोनाबाधित आहेत. वाचा: वाचा: आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६५ करोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवार करोनाबाधितांवर यशस्वी उपचार होण्याचे प्रमाण ७७.३२ टक्के इतका झाला आहे. कोविडबाधितांची संख्या वाढत असताना मृतांचे प्रमाण मात्र कमी होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. भारतात सात ऑगस्ट रोजी करोनाबाधितांच्या संख्येने २० लाखांचा आकडा ओलांडला. तर, २३ ऑगस्ट रोजी ही संख्या ३० लाख इतकी झाली. पाच सप्टेंबर रोजी ही संख्या ४० लाख इतकी झाली. भारतात आतापर्यंत चार कोटी ८८ लाख ३१ हजार १४५ जणांची चाचणी करण्यात आली आहे.

https://ift.tt/3fcy07h
September 06, 2020 at 01:16PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा