N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

संजय राऊतांना शिवसेनेनं दिली ताकद; पुन्हा मुख्य प्रवक्ते पदी वर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: सुशांतसिंह राजपूत व कंगना प्रकरणात विरोधकांना शेलक्या शब्दांत हिणवल्यामुळं वादात सापडलेले शिवसेनेचे खासदार यांच्यावर शिवसेनेनं पुन्हा एकदा ठाम विश्वास दाखवला आहे. संजय राऊत यांची पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं यापुढील काळातही राऊत हे विरोधकांवर बरसताना दिसणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते आहेत. त्याशिवाय, अन्य दहा प्रवक्त्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. वाचा: खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांचा अन्य प्रवक्त्यांमध्ये समावेश आहे. वाचा: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेला साजेशा अशा शैलीत राऊत हे पक्षाची भूमिका मांडत असतात. राज्यसभेवर खासदार असल्यानं दिल्लीतील घडामोडींवरही त्यांचं लक्ष असतं. अनेक पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांशीही त्यांची जवळीक आहे. पक्षाची भूमिका मांडताना त्यांना त्याचा अनेकदा फायदा होतो. संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक आहेत. 'सामना'तूनही पक्षाची भूमिका ते बिनधास्त मांडत असतात. त्यामुळं सतत देशपातळीवर चर्चेत असते. त्यांच्या ह्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन त्यांची पुन्हा एकदा मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जाते. वाचा:

https://ift.tt/3fau8np
September 08, 2020 at 09:23AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा