N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

भाजप आमदार म्हणतात, 'फेसबुकवर नाहीच तर मला बॅन कसं करणार?'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
हैदराबाद : '' अर्थात वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी आणि इन्स्टाग्रामनं बॅन केल्यानंतर तेलंगणाचे टी राजा सिंह यांनी 'माझं फेसबुकवर कोणतंही अकाऊंट नाही त्यामुळे बॅन करण्याचा प्रश्न येत नाही' असा दावा केलाय. इतकंच नाही तर () यांनी सोशल मीडिया कंपनी 'फेसबुक' काँग्रेसच्या दबावाखाली येऊन काम करत असल्याचं टी राजा यांनी म्हटलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आणि भाजपविरुद्ध खोटी माहिती पसरवल्याचंही राजा यांनी आरोप केलाय. तेलंगणाचे भाजपचे एकमेव आमदार टी राजा सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार, एप्रिल २०१९ पासून त्यांचं कोणतंही अधिकृत फेसबुक अकाऊंट नाही. आपल्या नावाचं फेसबुकनं जे फेसबुक पेज नुकतंच रद्द केलंय ते कदाचित फॉलोअर्सनं बनवल्याची शक्यता असू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी हैदराबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाला एक पत्र लिहून आपलं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याची तक्रारही नोंदविली होती, असं टी राजा यांनी म्हटलंय. त्यानंतर त्यांनी एक नवं सोशल मीडिया पेज सुरू केलं जे एप्रिल २०१९ मध्ये हटवण्यात आलं. 'एप्रिल २०१९ पासून मी फेसबुकवर नाही त्यामुळे मला बॅन करण्याचा प्रश्नच येत नाही. फेसबुक काँग्रेसच्या दवाबाखाली काम करत आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. वाचा : वाचा : उल्लेखनीय म्हणजे, हिंसात्मक, भावना भडकावणाऱ्या आणि आक्षेपार्ह पोस्टवरून कठोर पावलं उचलत फेसबुकनं गुरुवारी टी राजा सिंह यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बॅन केलं होतं. एका वेगळ्या व्हिडिओ संदेशात भाजप आमदार काँग्रेस नेते राहुल गांधींवर खोटी वक्तव्य करण्याचा आरोप करताना दिसत आहेत. फेसबुकनं चौकशी करून काँग्रेस आणि एआयएमआयएम पक्षाच्या खाते हटवावीत अशी मागणीही त्यांनी केलीय. आपण फेसबुकला एक पत्र लिहून आपलं अकाऊंट उघडण्यास सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय. WSJ च्या रिपोर्टमध्ये खुलासा 'भाजप नेत्यांच्या पोस्ट हटवल्या तर देशात कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होईल', असं फेसबुकच्या भारतातील अधिकारी अनखी दास यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमोर म्हटल्याचं नुकतंच समोर आलं होतं. अमेरिकेचं वर्तमानपत्र असलेल्या 'वॉल स्ट्रीट जर्नल' (WSJ)च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला होता. फेसबुकचे सर्वाधिक युझर्स भारतात आहेत. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
September 04, 2020 at 12:41PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा