कोविड १९ पथकावर हल्ला; डॉक्टरसह महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तपासणीसाठी जात असलेल्या आरोग्य विभागाच्या पथकावर हल्ला झाला. कोविड १९ पथकाची कार आणि रिक्षामध्ये धडक झाल्यानंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. शहरातील पंढरीनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदलालपुरा चौकात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नंदलालपुरा चौकात कोविड पथकाच्या कारला रिक्षा धडकली. त्यानंतर काही जणांनी कोविड पथकावर हल्ला चढवला. डॉ. बृजभूषण पटेल आणि त्यांचे पथक पोलीस लाईन येथे पोलीस अधिकाऱ्याची करोना चाचणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी पथकाची कार आणि रिक्षा यांच्यात धडक झाली. त्यानंतर काही जणांनी डॉ. पटेल यांना मारहाण केली. पथकातील महिला आरोग्य अधिकारी सरिता आणि कारचालक विनित चौहान यांना धक्काबुक्की केली. याआधीही इंदूरमध्ये आरोग्य विभागाच्या पथकाला मारहाण आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. नोडल अधिकारी डॉ. अमित मालाकार यांनी सांगितले की, रिक्षाचालक आणि कोविड पथकाच्या कारचा चालक यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर वाद वाढला. रिक्षाचालकाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पंढरीनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
https://ift.tt/3fcy07h
September 04, 2020 at 12:50PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा