N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'मन की बात' Live: देशभर संप्टेबर महिना 'पोषण महिना' म्हणून साजरा होणार- मोदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: () आपल्या '' () या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवांद साधत आहेत. पंतप्रधानांच्या मासिक रिडिओ बुलेटीनचे हे ६८ वे संस्करण आहे. या पूर्वी कारगिल विजय दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्या वेळी त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. पाहुया, 'मन की बात'च्या माध्यमातून काय म्हणत आहेत, पंतप्रधान मोदी... Live अपडेट्स... >> देश आज विकासाच्या दिशेने प्रवास करीत आहे. मात्र तेव्हाच या प्रवासाची सफलता सुखद असेल, जेव्हा या प्रवासात देशाचा नागरिक सहभागी असेल, या प्रवासातील एक प्रवासी असेल, या मार्गावरील एक वाटसरू असेल: पंतप्रधान मोदी >> आज देशात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र काहीतरी नवीन करत आहेत. मला खात्री आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे देश मोठा बदल घडवून आणणार आहे आणि याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास आमचे शिक्षक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील: पंतप्रधान मोदी >> स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या देशातील ध्येयवादी नायक कोण होते याचा परिचय आजच्या पिढीला, आपल्या विद्यार्थ्यांना असला पाहिजे, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहेः पंतप्रधान मोदी >> पोषण किंवा न्यूट्रिशन याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहात, आपण किती खात आहात, किती वेळा आपण खात आहात. याचा अर्थ आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे, हा आहे: पंतप्रधान मोदी >> सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल. राष्ट्र आणि पौष्टिकतेचे खूप चांगले नाते आहे. आपल्यात एक म्हण आहे - ' यथा अन्नम तथा मन्नम' म्हणजे जसे आपले अन्न असते, त्या प्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो: पंतप्रधान मोदी >> पूर्ण आत्मविश्वासने आपल्याला देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे- मोदी. >> आपल्या देशात अनेक कल्पना, अनेक संकल्पना आहेत, आपल्याकडे खूप समृद्ध इतिहास आहे. आम्ही त्यांच्यावर खेळ करू शकतो का ?: पंतप्रधान मोदी >> कम्प्युटर गेममध्ये देखील परदेशी थीम असण्यापेक्षा भारतातीलच थीम असायला पाहिजे- मोदी. >> देशातील तरुणांनी देशातच देशाची खेळणी तयार करावीत... चला खेळ सुरू करूनया... Lets Game begin- मोदी. >> भारताने पर्यावरणाला पुरक ठरतील अशी खेळणी तयार करायला हवीत- मोदी. >> भारताकडे मोठी परंपरा, संस्कृती असताना खेळण्याच्या बाजारात भारताचा वाटा फारच कमी आहे- मोदी. >> भारत देश खेळणी तयार करण्याचे केंद्र बनू शकतो- पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. >> राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुलांची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे- मोदी >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंपारण्यातील बर्ना गावाचा केला उल्लेख. >> करोनाच्या संकटाशी लोक विविध स्तरावर लढत आहेत- मोदी. >> देशातील नागरिकांमध्ये देशाच्या प्रती जबाबदारीची जाणीव दिसून आली- पंतप्रधान मोदी >> करोनाच्या या संकटकाळात देशातील लोक नियमांचे पालन करत आहेत- पंतप्रधान मोदी. >> करोना संकटकाळात लोकांनी संयम, साधेपणा दाखवला, गणेशोत्सव ऑनलाइन साजरा केला गेला- पंतप्रधान मोदी. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधणे सुरू... >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी थोड्याच वेळात सुरू होईल संवाद... >> गेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी स्वच्छता आणि करोना या महत्वाच्या मुद्यांवर देखील भाष्य केले होते. >> गेल्या वेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानवर देखील निशाणा साधला होता. >> या पूर्वी कारगिल विजय दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला होता. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी काय बोलणार याबाबत देशातील जनतेत उत्सुकता. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात'च्या ६८ व्या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.

https://ift.tt/3fcy07h
August 30, 2020 at 10:46AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा