श्रीनगरमध्ये गस्ती पथकावर हल्ला; ३ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद
N4U
१०:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
श्रीनगर: काश्मीरमधील पंथाचौक येथे शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या संयुक्त चौकीवर हल्ला केला. मोटरसायकलवर आलेल्या तीन दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला आणि ते पळून गेले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांच्या अतिरिक्त जवानांनी संपूर्ण परसराला घेरले. या नंतर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर एकूण ३ दहशतवादी ठार झाले. शहीद झालेला जवान हा जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आहे. या चकमकीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पंथाचौक परिसरात नाकाबंदी केली होती. नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. या दरम्यान एका मोटरसायकलवर तीन दहशतवादी आले. त्यांनी नाक्यावर पोहोचताच पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सावध होत जवानांनी देखील या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे पाहताच दहशतवाद्यांनी पंथाचौकातून पळ काढला. त्यानंतर परिसरात तैनात असलेल्या अतिरिक्त जवानांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली. एका मोहल्ल्यात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यांनी लागलीच त्या परिसराला घेराव घातला. यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करणे सुरू केले. त्यानंतर चकमक सुरू झाली. क्लिक करा आणि वाचा- एक पोलिस कर्मचारी जखमी या चकमकीदरम्यान जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा एक जवान जखमी झाला. या परिसरात हे दहशतवादी लपून बसले होते. त्यामुळे दहतवाद्यांना येथून दुसरीकडे पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून संपूर्ण परिसरालाच सर्व बाजूंनी बंद करण्यात आले. काळोख असल्याने जवानांना मोहीम राबवणे देखील कठीण जाक होते. कारण ज्या भागातदहशतवादी लपून बसले होतो, तो परिसर दाट लोकवस्तीचा आहे. क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
August 30, 2020 at 09:41AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा