N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

देशात स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईचा झेंडा, इंदूर अव्वल, पुण्याची मात्र निराशा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छतेबाबतच्या 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२०' च्या निकालांची आज घोषणा केली आहे. त्यानुसार मध्य प्रदेशातील इंदूरला सलग चौथ्या वर्षी स्वच्छतेत अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला पुन्हा अव्वल १० मध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले आहे. पुण्याला २०२० च्या सर्वेक्षणात १५ वे स्थान प्राप्त झाले असून पहिल्या १० शहरांत राज्यातून केवळ नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबईला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. तर नाशिक आणि ठाणे अनुक्रमे ११ व्या आणि १४ व्या स्थानावर, तर नागपूर १८ व्या क्रमांकावर आले आहे. देशाच्या नागरिकांमध्चे स्वच्छतेबाबत भागीदारी वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. गुरुवारी आयोजित होणाऱ्या स्वच्छ महोत्सवात स्वच्छता सर्वेक्षण अहवालाव्यतिरिक्त स्वच्छ सर्वेक्षण इनोव्हेशन, स्वच्छ सर्वेक्षण सोशल मीडिया आणि गंगेच्या किनावरील शहरांवरील अहवाल देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सलग चार वर्षे इंदूर शहर अव्वल स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्याच वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताव मैसूर या शहराने पटकावला होता . त्यानतर सतत चार वर्षे, म्हणजेच सन २०१७, २०१८ आणि २०१९ आणि आता सन २०२० मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. गेल्या वर्षी शहरांना सात प्रकारांमध्ये दिले पुरस्कार सर्वात स्वच्छ शहर : इंदूर सर्वात स्वच्छ राजधानी : भोपाळ सर्वात स्वच्छ मोठे शहर : अहमदाबाद (१० लाखांहून अधिक लोकसंख्या) सर्वात स्वच्छ मध्यम लोकसंख्येचे शहर: उज्जैन (३ ते १० लाखांची लोकसंख्या) सर्वात स्वच्छ छोटे शहर : एनडीएमसी दिल्ली (३ लाखांहून कमी लोकसंख्या) सर्वात स्वच्छ कंटोनमेंट: दिल्ली कँट सर्वात स्वच्छ गंगा टाउन : गोचर, उत्तराखंड

https://ift.tt/3fcy07h
August 20, 2020 at 11:59AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा