खळबळजनक! एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह लटकलेले होते
N4U
५:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
टिकमगढ: मध्य प्रदेशातील येथे खळबळजनक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. खरगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ८ मध्ये ही घटना घडली. येथील मनोहर सोनी यांच्यासह कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत खरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. ही हत्या की याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मृतांमध्ये धर्मदास सोनी, मनोहर सोनी, सोनम सोनी आणि सानिध्य सोनी यांचा समावेश आहे. धर्मदास हे पशुवैद्यकीय रुग्णालयात नोकरी करत होते. काही महिन्यांपूर्वीच ते निवृत्त झाले आहेत. धर्मदास आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह एकाच खोलीत लटकलेल्या अवस्थेत होता. तर एका महिलेच्या गळ्यात फास असला तरी, तिचे पाय जमिनीवर टेकलेले होते. खोलीतील दृश्य पाहून संशय व्यक्त केला जात आहे. ज्यांच्या गळ्यात फास अडकलेला होता, त्यांचे पाय जमिनीवर लटकलेल्या अवस्थेत होते. जर जमिनीवर पाय टेकलेले असतील तर ही आत्महत्या कशी काय होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.
https://ift.tt/3fau8np
August 23, 2020 at 04:05PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा