N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

रात्रीची वेळ, 'ती' न्यूज अँकर प्रचंड घाबरली; मागं वळून पाहिलं तर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
अहमदाबाद: दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका वृत्तवाहिनीत न्यूज अँकर असलेल्या तरुणीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीवरून जाताना या तरुणीचा त्याने कारमधून पाठलाग केला. त्यानंतर तिच्याकडे बघून अश्लिल इशारेही केले. रात्रीची वेळ असल्याने ही तरुणी प्रचंड घाबरली होती. पीडित तरुणी एका गुजराती भाषिक वाहिनीत न्यूज अँकर म्हणून काम करते. तिनं बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुचाकीवरून घरी जात असताना तरुणाने आपला पाठलाग केला आणि आपल्याकडे पाहून अश्लिल इशारेही केले, असा आरोप या तक्रारीत केला आहे. त्यानंतर काही तासांतच वस्रपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भाविन पटेल (वय ३३) असं या तरुणाचं नाव असून, औषध उत्पादनांसाठी बॉक्स तयार करण्याचे काम तो करतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक वाय. बी. जडेजा यांनी दिली. पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, २८ वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री गांधीनगरहून अहमदाबादकडे जात होती. ती एस.जी. रोडवर छारोडी क्रॉसरोड्स येथे पोहोचली असता, आपला कारने कुणीतरी पाठलाग करत आहे असं तिच्या लक्षात आलं. त्यामुळं ती प्रचंड घाबरली. तिनं शेवटी रस्ता बदलला. ती मानसी सर्कलकडे केली. मात्र, त्यानं काही पाठलाग करणं सोडलं नाही. मानसी सर्कलमध्ये ती थांबली. त्यावेळी तिच्याकडे बघून त्यानं अश्लिल इशारे केले. तरुणी खूप घाबरलेली होती. तिनं पोलीस नियंत्रण कक्षाशी हेल्पलाइन क्रमांकावरून संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र पोलीस तिथं येईपर्यंत तो तरूण पसार झाला होता. रात्री खूप उशीर झाल्यानं ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली नाही. बुधवारी रात्री तिनं वस्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

https://ift.tt/3fcy07h
July 24, 2020 at 01:06PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा